बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे. संपूर्ण राज्यातून या घटनेवर संचाप व्यक्त केला जात आहे. संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. सरपंच देशमुख यांना मोठ्या प्रमाणात घाव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल सीआयडीकडे आला आहे. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात घाव झाला होता. अतिरक्तस्त्राव झाल्याने संतोष यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या छाती, हात, पाय, चेहरा आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. आठ पानी अहवाल सीआयडीकडे आला आहे.
हेही वाचा : नागपूरातील संविधान चौकात मविआचं आंदोलन
भाजपाचे आमदार सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी विधानसभेत संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा धक्कादायक तपशील मांडला आहे.
संतोष देशमुख यांना जबर मारहाण करण्यात आली. त्यांच्या अंगावर विविध ठिकाणी मुका मार दिल्याने रक्तस्त्राव झाला आहे. त्यामुळे ते शॉकमध्ये गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात सांगितले आहे. आरोग्य विभागाकडून हा अहवाल सीआयडीकडे देण्यात आला आहे. 'हॅमरेज अँण्ड शॉक ड्यू टू मल्टिपल इन्जुरिज' असे संतोष देशमुख यांच्या मृत्यूचे कारण असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टरांनी दिली आहे. संतोष यांच्या छाती, हात, पाय, चेहरा आणि डोक या अवयवांना मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्याचा भाग मारहाण केल्याने काळा-निळा पडला होता. त्यामुळे मारेकऱ्यांनी संतोष देशमुख यांचे डोळे जाळून टाकल्याची चर्चा आहे.
नेमकं प्रकरण काय?
सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबरला अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात विष्णू चाटेसह चौघांना अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या जवळचा माणूस असल्याचे समजते. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.