राज्याच्या राजकारणात माजी मंत्री तानाजी सावंत यांचे नाव सतत चर्चेत राहिलं आहे. त्यांची ही वादग्रस्त विधाने प्रसिद्ध झाल्यावर त्यांनी माध्यमांनाच खडेबोल सुनावत त्यावर स्वतःच पडदा टाकण्याचे काम त्यांनी केलंय. आता तानाजी सांवत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची बातमी आली आणि पूर्ण प्रशासन 'कामाला' लागले. दुपारी घरातून कोणालाही न सांगता निघालेला सावंत यांचा ऋषिराज हा मुलगा खासगी विमानाने बँकॉकला निघाल्याचे समजल्यावर त्याच रात्री त्याला परत बोलावले गेले. यासंपूर्ण अपहरणनाट्यात अपहरण केल्याचं वा तसा कट असल्याचं अद्याप कुठेही समोर न आल्यानं सावंत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
हेही वाचा: दुःखाचा डोंगर बाजूला सारून वैभवीने दिला बारावीचा पेपर
तानाजी सावंतांचीआधीची वादग्रस्त विधाने
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याची घटना घडली होती
त्या घटनेचं खापर त्यांनी खेकड्यांवर फोडलं होतं
खेकड्यांच्या पोखरण्यामुळे हे धरण फुटल्याचं लक्षात येतयं, असं त म्हणाले होते
आरोग्यमंत्री असताना रुग्णालयात औषधे कमी पडत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता
हाफकीनकडून वेळेत औषधे मिळत नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले
त्यावर 'तुम्ही त्या "हाफकीन" या माणसाकडून औषधे घेता ते बंद करा!' असं सावंत म्हणाले
मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता
सत्तांतर होताच मराठा आरक्षणाची खाज सुटली, असं ते विधान होतं
तानाजी सावंत यांच्या विधानानंतर त्यांनी प्रत्येकवेळी माफी मागितली आहे
सोमवारी सायंकाळी त्यांचा मुलगा ऋषिराज सावंत घरी न सांगता अचानक गायब झाला. तानाजी सावंत आणि त्यांच्या कुटुंबियांनी शोध घेत थेट पोलीस ठाणे गाठले आणि मुलाच्या अपहरणाची तक्रार नोंदवली. मुलगा कोणालाही न सांगता कुठे गेलाय, याचा शोध घेण्याची विनंती पोलिसांना करत त्यांनी अपहरण झाल्याची शक्यता वर्तवली.
सावंताच्या तक्रारीनंतर पोलिसांना तातडीने शोधमोहिम उघडली, दरम्यान कंट्रोल रूमला याबाबत एक दूरध्वनी आल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. सावंत यांचा मुलगा खासगी विमानाने बँकाँककडे जात होता. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र होते. त्याला त्यांच्या वाहनचालकानेच विमानतळावर सोडले, ते विमान पोलिसांनी रात्री उशिराने पुण्याला परत बोलावून ऋषिराज सावंत सुखरूप असल्याचे सांगितले.असं नंतर पोलिसांनीच सांगितले.
या संपूर्ण घटनेनंतर तानाजी सावंत यांचा मोठा मुलगा गिरीराज सावंत यांने याबाबतचा खुलासा केलाय. त्यांच्या म्हणण्यांनुसार ऋषिराज त्याच्या व्यावसायिक कामांसाठी बँकॉकला जात होता. या खुलाशाने याप्रकरणीतील संशय दूर होण्याऐवजी अधिक गडद होतंय..
गिरीराज सावंत याचा खुलासा
सोमवारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास लहान भावाचा मेसेज आला
तो दोन दिवसांसाठी बाहेर चालला आहे
आठ-दहा दिवसांपूर्वी तो दुबईला गेला होता
सहा-सात दिवसांपूर्वीच तो आला
आणि पुन्हा अचानक फोन बंद करून तो निघून गेला
तो खासगी विमानाने बँकॉकला निघाला होता
त्याच्या बिझनेसबाबत त्याचे काही खासगी काम तिथे होते
हेही वाचा: तुषार भोसलेंकडून भुजबळांचा खरपूस समाचार
तानाजी सांवत यांचा मुलगा सुखरूप परतला, ही समाधानाची बाब असली तरी त्याचे अचानक जाणे, त्याने कोणाला न सांगणे, बँकॉकला जाण्यासाठी तब्बल 68 कोटी रुपयांचे खासगी विमान आरक्षित करणे अशा अनेक घटनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्याची उत्तरे पुणे पोलीस आणि तानाजी सावंत यांना द्यावी लागणार आहेत. वरकरणी हा कौटुंबिक वाद असावा अशी एक शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र, तानाजी सावंत यांनी आपले कोणतेही वाद नव्हते असं स्पष्ट केलंय. हे अपहरण होते की ते त्यांच्या मर्जीने जात होते?, त्यांचा मुलगा ज्या विमानाने बँकॉकला जात होता त्याचे आरक्षण कोणी केलं होतं?, त्याच्यासोबत असलेले दोन मित्र कोण होते?, बँकॉकला तिघे कशासाठी आणि किती दिवसांसाठी जात होते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता पोलिसांनाच शोधावी लागणार आहेत. अपहरणाची बातमी ज्या वेगाने पसरली आणि पोलिसांनी तत्परता दाखवत ते विमान माघारी बोलावलं, त्याच तत्परतेनं या आणि यासंदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरे सांवत कुटुंबीय आणि पोलीस प्रशासन देणार आहेत का? प्रसासकीय यंत्रणांना 'कामाला' लावणाऱ्या तानाजी सावंत यांच्या मुलावर पुढे काय कारवाई होणार? असा एक सामान्य प्रश्न जनतेला पडला आहे.