अविनाश परबत. प्रतिनिधी. पुणे: वैष्णवी हगवणे हुंडाबळीचे प्रकरण ताजे असतानाच आता एका नवीन हुंडाबळीचा प्रकार समोर आला आहे. हिंजवडी येथील ऐश्वर्या हुलावळे या महिलेची 18 फेब्रुवारी 2017 रोजी आदित्य हुलावळे यांच्यासोबत विवाह झाला होता. लग्नात सासरच्यांनी चारचाकी गाडी आणि चांदीच्या वस्तूंची मागणी केली होती. सासरच्यांच्या मागण्या पूर्ण करून लग्न थाटामाटात लाऊन दिले गेले. मात्र, लग्नाच्या काही दिवसांनी सासरच्या व्यक्तींकडून ऐश्वर्याला मारहाण करण्यात येऊ लागली, अशी माहिती ऐश्वर्याने दिली.
हेही वाचा: 'अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; लाडकी बहीण योजनेवरून राऊतांचा हल्लाबोल
'माहेरकडून पाच लाख रुपये घेऊन ये, अन्यथा तुला आम्ही नांदवणार नाही', अशी धमकी तिला मिळू लागली. ऐश्वर्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन 'घरी जेवणासोबत औषधेही दिली जात होती आणि पाणी देखील पिण्यास दिले जात नव्हते', असा आरोप केला. जेव्हा आम्ही याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी गेलो, तेव्हा सुरुवातीला आम्हाला असे सांगण्यात आले की कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.
हेही वाचा: RCB vs PBKS IPL 2025 Final: आयपीएल 2025 अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार?
दरम्यान, तरीही सासरचे लोक तक्रार दाखल केल्यास तिला जीवघेणी धमकी देत होते. ऐश्वर्यांनी म्हटले की कोरोना काळात तिचा छळ झाला नव्हता, परंतु कोरोनानंतर केस मागे घेण्याची धमकी देण्यात आली होती. इतकेच नाही तर, मार्च 2025 मध्ये महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने महिलांवरील अन्याय आणि अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला जात असल्याचे ऐश्वर्यांनी सांगितले. यावेळी ऐश्वर्यांनी आपल्यावर मारहाण होत असतानाचा व्हिडिओ देखील पत्रकारांसमोर सादर केला.