शिर्डी : शिर्डीत झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. प्रत्येक वॉर्डात ग्राम सुरक्षादल स्थापन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. गुन्हेगारी मोडीत काढा, अन्यथा पोलीस ठाण्याला टाळं ठोकू असा आक्रमक पवित्रा शिर्डीतील ग्रामस्थांनी घेतला आहे. यावेळी ग्रामस्थ संतप्त झालेले दिसून आले.
शिर्डीत झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डीचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. पोलीस प्रशासनाविरोधात निषेध ग्रामसभा घेत येत्या एक महिन्यात शिर्डीतील गुन्हेगारी मोडीत काढा अन्यथा पोलीस ठाण्याला टाळे ठोकू अशा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. शिर्डीत लुटमार करताना झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डीतील वाढती गुन्हेगारी चव्हाट्यावर आली आहे. या विरोधात ग्रामस्थ एकवटले असून सोमवारी रात्री निषेध ग्रामसभा घेत पोलीस प्रशासनाच्या कामकाजा विरोधात ग्रामस्थांनी खडेबोल सुनावले आहेत. शहरात अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट झाला असून आर्थिक हितसंबंधातून पोलीस डोळेझाक करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
हेही वाचा : पालकमंत्रिपदावरुन शिवसेना - राष्ट्रवादीत वाढला दुरावा
ग्रामस्थ आता पोलिसांवर अवलंबून न राहता प्रत्येक वार्डात ग्राम सुरक्षादल स्थापन करणार असून येत्या एक महिन्यात शिर्डीतील गुन्हेगारी, अवैध व्यवसाय मोडीत काढा अन्यथा पोलीस ठाण्याला टाळे ठोकणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
शिर्डीतील ग्रामस्थांचा अनोखा निर्णय
दुहेरी हत्याकंडानंतर शिर्डीतील ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिस प्रशासनाविरोधात त्यांनी पावले उचलायला चालू केली आहेत. एक महिन्यात शिर्डीतील गुन्हेगारी मोडीत काढा नाहीतर पोलीस ठाण्याला टाळे ठोकू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. शिर्डीत लुटमार करताना झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डीतील वाढती गुन्हेगारी चव्हाट्यावर आली आहे. या सगळ्याविरोधात ग्रामस्ठ एकवटले आहेत. सोमवारी रात्री निषेध ग्रामसभा घेत पोलीस प्रशासनाच्या कामकाजाविरोधात ग्रामस्थांनी खडेबोल सुनावले आहेत.