Wednesday, September 03, 2025 11:09:37 AM

Latur: 'माता मृत्यू' रोखण्यात सरकार अपयशी?, महिलांचा मृत्यूबद्दल धक्कादायक माहिती समोर

'माता मृत्यू' म्हणजे गर्भधारणा, बाळंतपण किंवा बाळंतपणानंतर 6 आठवड्यांत झालेल्या मृत्यूंची संख्या होय.

latur माता मृत्यू रोखण्यात सरकार अपयशी महिलांचा मृत्यूबद्दल धक्कादायक माहिती समोर

लातूर : 'माता मृत्यू' म्हणजे गर्भधारणा, बाळंतपण किंवा बाळंतपणानंतर 6 आठवड्यांत झालेल्या मृत्यूंची संख्या होय. 1 लाख जिवंत बाळांच्या जन्मानंतर किती मातांचा मृत्यू झाला? यावरून भारतातील 'माता मृत्यू' दर हा ठरवला जातो. यालाच एमएमआर असेही म्हणतात.

देशात एक लाख मुलांच्या जन्मानंतर 97 मातांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले. देशात सर्वात कमी 19 हा 'माता मृत्यू' दर केरळ राज्यात असून महाराष्ट्रात हाच मृत्यू दर 33 एवढा आहे. तर लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात मागील 5 वर्षात 140 माता मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले आहे. यामुळे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर कोट्यवधी खर्चुन उभ्या केलेल्या योजना निकामी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा : साताऱ्यातील लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज; पालकांना मिळेना मेडिकल इमर्जन्सी व्हिसा

प्रसूतीनंतर रक्तस्त्राव, संसर्ग, उच्च रक्तदाब, हृदयरोग या प्रमुख कारणांमुळे माता मृत्यू अधिक होत आहेत. सन 2024 मध्ये एप्रिल ते डिसेंबर या 9 महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रात तब्बल 913 माता मृत्यू झाले आहेत. माता मृत्यू रोखण्यासाठी आता ग्रामीण भागातील महिलांनीही अधिक जागरूक होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

माता मृत्यू रोखण्यासाठी शासनाने कोट्यावधी रुपये खर्चून अनेक योजना सुरु केल्या पण माता मृत्यू रोखण्यात शासन अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महिलांसाठीच्या शासकीय योजनांचा मोठा गाजावाजा केला जात असला तरी धोका टाळण्यासाठी अजूनही खाजगी रुग्णालयात प्रसूती करण्याचा सल्ला दिला जातो आहे. ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयात महिलांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा अजूनही उपलब्ध होत नसल्याचे वास्तव चित्र दिसून येत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सांगत आहेत.

हेही वाचा : Pune Bus Rape Case: पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची अजब युक्ती

माता मृत्यूची कारणे आणि टक्केवारी -

अती रक्तदाब - 18.5 टक्के

प्रसुती पश्चात रक्तस्त्राव - 14.2 टक्के

झटके येणे - 11.4 टक्के

जंतु संसर्ग - 9.2 टक्के

लिव्हरचे आजार - 6.4 टक्के

हृदयाचे आजार - 5 टक्के

रक्तक्षय तीव्र - 4.2 टक्के

गर्भपात गुंतागुंत - 2.1 टक्के

गर्भ पिशवी फाटणे - 0.7 टक्के

 

महिलांसाठी शासनाच्या कोणत्या योजना आहेत ?

1) जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम

2) प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान

3) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना


सम्बन्धित सामग्री