मुंबई: एसटी महामंडळातील महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आमदार चित्रा वाघ यांनी मांडलेल्या मागण्यांपैकी जवळपास सर्वच मान्य करण्यात आल्या.
यामुळे आता एसटी बसमधील महिला प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित होणार आहे. राज्य सरकारने महिला सुरक्षेसाठी नवीन SOP (Standard Operating Procedure) तयार केली असून, त्याअंतर्गत खालील निर्णय घेण्यात आले आहेत:
- सर्व एसटी बसमध्ये CCTV कॅमेरे आणि ट्रॅकिंग सिस्टीम बसवणे अनिवार्य
- बंद पडलेल्या बस 15 एप्रिलपर्यंत स्क्रॅपमध्ये टाकण्याचे आदेश
- आगारात पडून असलेली सर्व भंगार वाहने हटवण्याचे निर्देश
- बसचे नियमित ऑडिट करून सुरक्षेच्या उपाययोजना राबवणे
- सुरक्षा रक्षकांमध्ये महिलांची संख्या वाढवण्याचा निर्णय
- महिला सुरक्षेसाठी अधिकाऱ्यांची विशेष नेमणूक
- एसटी महामंडळात IPS अधिकारी नेमण्याची मागणी
महिला प्रवाशांसाठी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयांबद्दल आमदार चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले आहेत.