Wednesday, August 20, 2025 08:46:50 PM

सुरेश धस यांची अजित पवारांच्या भेटीनंर मागणी

'बीड प्रकरणातील सर्व आरोपींना मकोका लावा' सुरेश धस यांची अजित पवारांच्या भेटीनंर मागणी

सुरेश धस यांची अजित पवारांच्या भेटीनंर मागणी

बीड : सरपंच संतोष देशमुख प्रकरणी सर्वत्र पडसाद उमटताय. त्यातच आता संतोष देशमुख प्रकरणात सातत्याने आरोपांची मालिका जाहिर करणारे भाजपा आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. धस यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीनंतर अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे धस-पवार भेटीबाबत राजकीय उत्सुकता वाढली आहे. भेटीनंतर प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत आपण धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली नसल्याचे आमदार धस यांनी सांगितलंय. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

बीड हत्याप्रकरणी आकाला आणि आकाच्या आकाला अटक करण्याची मागणी धस यांनी सातत्याने केली होती. मात्र या प्रकरणात खंडणीच्या गुन्ह्यात अटक असलेला वाल्मिक कराड हाच आका असल्याचे धस यांनी सांगितलंय. सर्वपक्षीय मोर्चात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वांनी केली होती. आता या प्रकरणातील आरोपींची मालमत्ता पुढील दोन दिवसात जाहिर करणार असून त्या सर्व आरोपींना मकोका लावण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

त्याचबरोबर बीड हत्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुंबीयांना आश्वासित करताना बीड मधील गुन्हेगारी संपूर्णतः सोडवण्यासाठी कठोर कारवाई होत नाही तोवर थांबणार नाही असं ठामपणे फडणवीस यांनी सांगितलं आहे. 
 


सम्बन्धित सामग्री