Friday, September 19, 2025 08:19:22 PM

Thane Metro: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! ठाणे मेट्रो लाइन-4A ट्रायल रनसाठी सज्ज; वाहतूक कोंडीची कटकट लवकर संपणार

ठाणे शहरातील रहिवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

thane metro ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी ठाणे मेट्रो लाइन-4a ट्रायल रनसाठी सज्ज वाहतूक कोंडीची कटकट लवकर संपणार

Thane Metro: ठाणे शहरातील रहिवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शहरातील पहिली मेट्रो ट्रेन लवकरच ट्रायल रनसाठी सज्ज झाली असून, येत्या सोमवारी (22 सप्टेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या ट्रायलचा मुहूर्त होणार आहे. ट्रायल रननंतर मेट्रो सेवा सुरु होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न काही प्रमाणात सुटेल, असा अंदाज आहे.

ठाणे मेट्रो प्रकल्पातील पहिल्या फेजमध्ये 10.5 किलोमीटरची मेट्रो लाईन तयार झाली आहे. या लाईनवर 10 महत्वाचे स्थानक आहेत.

हेही वाचा: Mumbai High Court Bomb Threat: मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा बॉम्बची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

ठाणे मेट्रो मार्गिका 4-A वरील स्थानकं:

1. कॅडबरी

2. माजीवाडा

3. कपूरबावाडी

4. मानपाडा

5. टिकूजी-नी-वाडी

6. डोंगरी पाडा

7. विजय गार्डन

8. कासरवाडावली

9. गोवानिवाडा

10. गायमुख

या 10 स्थानकांवर ट्रायल रन करण्याची तयारी पूर्ण झाली असून, सर्व स्टेशनवर सुरक्षा आणि तांत्रिक तपासण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.

ठाणे मेट्रो प्रकल्पाचे उद्दीष्ट शहरातील वाहनांची संख्या कमी करून वाहतूक सुरळीत करणे आहे. शहरात दिवसेंदिवस वाढणारी कोंडी रहिवाशांसाठी मोठी समस्या बनली होती. मेट्रो सेवेमुळे प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची संधी मिळेल. यामुळे दैनंदिन प्रवासाचा वेळ वाचेल आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढेल, असा ठाण्याच्या प्रशासनाचा विश्वास आहे.

हेही वाचा:Dombivali Local Train : डोंबिवलीकरांसाठी लोकलमध्ये जागाच नाही! 'या' शहरांतील प्रवासी सीट अडवत असल्यामुळे स्थानिक त्रस्त

ठाणे मेट्रो मार्गिका 4-4 अ वर 25 ऑगस्ट रोजी मेट्रो डबे मार्गिकेवर ठेवण्यात आले होते. हा उन्नत प्रकल्प असल्यामुळे क्रेनच्या मदतीने डबे ट्रॅकवर सुरक्षितपणे बसवले गेले. आता ट्रायल रनसाठी सर्व तांत्रिक तयारी पूर्ण झाली आहे. नवरात्राच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा ट्रायल रन सुरू होणार असल्याने ठाणेकरांमध्ये उत्साह आहे.

मेट्रो प्रकल्पामुळे केवळ शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार नाही, तर पर्यावरणाचेही फायदे होतील. वाहनांची संख्या कमी झाल्याने प्रदूषण कमी होईल आणि नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीचा अनुभव मिळेल. तसेच, ट्रायल रन आणि मेट्रो सेवा सुरु झाल्यानंतर ठाण्यातील व्यापार, शाळा-महाविद्यालये आणि व्यावसायिक क्षेत्रांवरही सकारात्मक परिणाम होईल.

सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, ठाणे मेट्रो प्रकल्प शहराच्या पायाभूत सुविधांसाठी महत्त्वाचा टप्पा आहे. ट्रायल रनच्या यशस्वीतेनंतर पुढील टप्प्यात अधिक मेट्रो लाईन्स आणि विस्तार योजना सुरु करण्याचा मानस आहे. प्रवाशांना सुरक्षित, वेगवान आणि आधुनिक प्रवासाची सुविधा मिळावी, हा प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे.

ठाणेकरांसाठी हा प्रकल्प केवळ वाहतूक सुलभ करणारा नाही, तर शहराच्या विकासासाठीही महत्वाचा मानला जात आहे. येत्या काही महिन्यांत मेट्रो सुरु झाल्यानंतर प्रवाशांना शहरात सहज आणि वेगवान प्रवासाची संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

 


सम्बन्धित सामग्री