मुंबई : राज्यात नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा चर्चेत आहे. जानेवारी महिन्यात सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर करण्यात आले. मात्र नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाबद्दल घोषणा करण्यात आली नाही. कारण त्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नव्हता. पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर पडदा टाकला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच नाशिकसाठी पालकमंत्री जाहीर करू असे मोठे वक्तव्य नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जोपर्यंत जिल्ह्याला पालकमंत्री जाहीर होत नाही तोपर्यंत पालकमंत्रीपद सांभाळण्याचे काम मुख्यमंत्र्यांकडे असते असेही फडणवीस यांनी म्हटले. युवा उद्योजकांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत वक्तव्य केले. नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाची चर्चा अंतिम टप्प्यात असताना मुख्यमंत्र्यांकडून थेट उत्तर देण्यात आले आहे.
हेही वाचा : Twitter Blue Bird Auction: ट्विटरच्या ब्लू बर्डचा झाला लिलाव; किती रुपयांना विकला गेला लोगो? जाणून घ्या
मुख्यमंत्री फडणवीस नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात आढावा बैठक घेतली. बैठकीला महाजन, दादा भुसेंची उपस्थिती होती. यावेळी नाशिकच्या कुंभमेळ्यासंदर्भात उत्तर प्रदेशप्रमाणे कायदा करणार असल्याचे त्यांनी म्हटले. पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 1 हजार 100 कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला. विकास आराखडा प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळेल. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचा विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.