Sunday, August 31, 2025 11:15:43 AM

घरगड्याची संपत्ती मालकापेक्षा जास्त; उद्धव ठाकरेंची शिंदेंवर बोचरी टीका

जगातली सर्वात मोठ्या पक्षाचा जीव मुंबई महापालिकेत अडकलाय असा हल्लाबोल ठाकरे गटाच्या उद्धव ठाकरे यांनी  भाजपावर केला आहे.

घरगड्याची संपत्ती मालकापेक्षा जास्त उद्धव ठाकरेंची शिंदेंवर बोचरी टीका

मुंबई: जगातली सर्वात मोठ्या पक्षाचा जीव मुंबई महापालिकेत अडकलाय असा हल्लाबोल ठाकरे गटाच्या उद्धव ठाकरे यांनी  भाजपावर केला आहे. तर घरगड्याची संपत्ती मालकापेक्षा जास्त असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील डिवचले आहे. 
'घरगड्याची संपत्ती मालकापेक्षा जास्त'  
उद्धव ठाकरे यांनी बैठकीतून भाजपावर जोरदार टीका केली आहे. भाजपाला मुंबई आणि मराठी माणसाची ताकद दाखवावी लागेल. आपली लढाई मुंबईसाठी, ती लढाई आपल्याला जिंकायची आहे. मिंधे स्वतःला मोदींचा घरगडी म्हणतो, घरगड्याची शेती बघा, घरगड्याची संपत्ती मालकापेक्षा जास्त असल्याचे म्हणत उद्धव यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे. 

हेही वाचा : Dharashiv Murder Case: पत्नी आणि 2 वर्षाच्या मुलाची हत्या करून तरुणाची आत्महत्या

'मुंबईकरांची आम्हाला काळजी आहे'
आमचा जीव महानगरपालिकेत अडकलाय. उद्धव ठाकरे तुमचं म्हणणं मान्य आहे. कारण तुम्ही 20 ते 25 वर्ष मुंबईकरांचा अक्षरशः जीव घेतला. मुंबईकरांची आम्हाला काळजी आहे असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंना प्रवीण दरेकर यांनी दिलं आहे. 


सम्बन्धित सामग्री