Vat Purnima 2025: भारतीय संस्कृतीत अनेक सण हे केवळ श्रद्धेचे नव्हे, तर अध्यात्म, आरोग्य, पर्यावरण आणि समाजकल्याण यांचे प्रतीक आहेत. त्यापैकीच एक अत्यंत पवित्र आणि महिलांसाठी विशेष महत्त्व असलेला सण म्हणजे वटपौर्णिमा. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि व्रत पाळतात. पण केवळ पूजा करून थांबायचं नसून, काही विशिष्ट गोष्टींचे दान केल्याने आयुष्यातील अडथळे दूर होतात, असे शास्त्रात सांगितले गेले आहे.
वटपौर्णिमा 2025 : शुभ तिथी आणि वेळ
यंदा वटपौर्णिमा मंगळवार, 10 जून 2025 रोजी साजरी होणार आहे. पौर्णिमा तिथी सकाळी 11:35 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 जून रोजी दुपारी 1:13 वाजता समाप्त होईल. वडाच्या पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी 2:05 वाजता आहे.
हेही वाचा: Vat Purnima 2025: वटपौर्णिमेच्या दिवशी नेसू नये 'या' रंगाची साडी; जाणून घ्या यामागचं धार्मिक कारण
वटपौर्णिमेच्या दिवशी दान करावयाच्या गोष्टी:
अन्नाचे दान पुण्य आणि समाधान मिळवण्याचा मार्ग
वटपौर्णिमेच्या दिवशी अन्नाचे दान केल्याने मानसिक समाधान मिळते. शास्त्रानुसार, अन्नदान केल्याने पापांचा नाश होतो, आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते. गरजूंना अन्न दिल्याने त्यांच्या आशीर्वादाचा लाभही मिळतो.
वस्त्रांचे दान; समृद्धीचा संकेत
या दिवशी गरजू महिलांना किंवा वृद्धांना नवीन वस्त्रांचे दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. हे दान तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी कमी करते आणि आयुष्य अधिक स्थिर व सुखी बनवते.
पाण्याचे दान; जीवनदानाचे प्रतीक
उन्हाळ्याच्या तोंडावर वटपौर्णिमा येते आणि या काळात जलदानाचे फार महत्त्व आहे. पाणी म्हणजे जीवन आणि पाण्याचे दान म्हणजे एक प्रकारचे अमृतदान. रस्त्याच्या कडेला पाणपोई लावणे, जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करणे हे देखील पवित्र कृत्य मानले जाते.
हेही वाचा: Vat Purnima 2025Vat Purnima 2025: नवविवाहित महिलांनी अशा पद्धतीने साजरी करावी वटपौर्णिमा; जाणून घ्या पूजेची योग्य पद्धत आणि कथा
वटपौर्णिमेचा आध्यात्मिक आणि पर्यावरणीय अर्थ
वडाचे झाड हे हिंदू धर्मात केवळ झाड नसून, त्रिदेवांचे (ब्रह्मा, विष्णू, महेश) प्रतीक मानले जाते. या झाडाभोवती सात प्रदक्षिणा मारताना स्त्रिया कच्च्या दोऱ्याने फेऱ्या मारतात या फेऱ्या म्हणजे सात जन्मांच्या नात्याचे प्रतीक! शिवाय, वडाचे झाड भरपूर ऑक्सिजन देणारे झाड असल्याने पर्यावरण दृष्टीनेही ते अमूल्य आहे.
वटपौर्णिमा म्हणजे श्रद्धा, नाती, निसर्ग आणि दानधर्म यांचा सुंदर संगम. या दिवशी केवळ विधी न करता मनोभावाने दान करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने व्रताचे फल मिळवणे. या पावन दिवशी अन्न, वस्त्र, पाणी यांचे दान करून आपण फक्त इतरांचे जीवन उजळवत नाही, तर आपलेही आयुष्य शांत, समृद्ध आणि कर्जमुक्त बनवतो.