Wednesday, August 20, 2025 08:34:00 PM
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट परिसरात आज सकाळी डिझेल टँकरला भीषण आग लागल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे.
Samruddhi Sawant
Wednesday, December 04 2024 09:41:27 PM
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट परिसरात आज सकाळी डिझेल टँकरला भीषण आग लागल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. काही वेळांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे वाहनाची अवस्था एवढी खराब झाली आहे की ओळखणे अशक्य झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, डिझेल टँकरमध्ये स्फोट झाल्यामुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
घटना कणकवलीपासून काही अंतरावर फोंडाघाट परिसरात घडली. या मार्गावरून पश्चिम महाराष्ट्राला होणारी संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. सध्या अग्निशमन दलाचे पथक आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
View this post on Instagram A post shared by Jai Maharashtra News (@jaimaharashtralive)
A post shared by Jai Maharashtra News (@jaimaharashtralive)
या भीषण आगीत टँकरचे मोठे नुकसान झाले असून स्फोटामुळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. सुदैवाने, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
फोंडाघाट मार्ग हा पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा दळणवळण मार्ग असल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना तात्पुरता पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.या घटनेमुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून आग कशी लागली याचा तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले असून घटनेतील नुकसान आणि जीवितहानीबाबत अधिकृत माहिती लवकरच उपलब्ध होईल, असे सांगितले आहे.
Wednesday, December 04 2024 09:29:31 PM
5
गणेशोत्सव आता काही दिवसांवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर, सोने किंवा चांदी खरेदी करण्यासाठी अनेक लोक दागिन्यांच्या दुकानात गर्दी करत आहेत.
Ishwari Kuge
Wednesday, August 20 2025 04:14:02 PM
वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंत्यसंस्कार करताना स्मशानभूमीचं छत कोसळलं. या घटनेमुळे, स्मशानभूमी परिसरात एकच खळबळ उडाली.
Wednesday, August 20 2025 02:56:59 PM
कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार (वय: 94) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मागील काही काळापासून त्या आजारी होत्या.
Monday, August 18 2025 10:27:23 PM
16 ऑगस्ट रोजी देशभरात दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. 'गोंविदा आला रे आला', 'अरे बोल बजरंग बली की जय' अशा गजरात अनेक गोविंदा मानाच्या हंड्या फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत.
Saturday, August 16 2025 01:09:31 PM
मरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात एक महत्वाची शस्त्रक्रिया पार पडली. पोटदुखीने त्रस्त असलेल्या एका 18 वर्षीय तरुणीच्या पोटातून 10 किलो वजनाचा गोळा बाहेर काढण्यात आला आहे.
Saturday, August 16 2025 11:12:48 AM
दिन
घन्टा
मिनेट