Wednesday, August 20, 2025 11:58:18 PM

VIDEO : नाशिकमध्ये रिक्षावाल्याची गुंडगिरी; कुटुंबीयांसह हात जोडून विनवणाऱ्या कारचालकाला शिवीगाळ करत मारहाण

नाशिक शहरात रिक्षा चालकांकडून अनेक वेळा कार चालकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. भर रस्त्यात रिक्षा उभ्या करणे, इतर वाहन चालकांशी हुज्जत घालत भांडण करणे असे प्रकार अनेक वेळा घडल्याचे दिसून आलेत

video  नाशिकमध्ये रिक्षावाल्याची गुंडगिरी कुटुंबीयांसह हात जोडून विनवणाऱ्या कारचालकाला शिवीगाळ करत मारहाण

नाशिक: शहरामध्ये मुजोर रिक्षा चालकाची गुंडगिरी पाहायला मिळाला आहे. तरुण कारचालकाची गाडी अडवून या रिक्षा चालकाने त्याला शिवीगाळ आणि मारहाण केली आहे. गाडीतला तरुण आणि त्याची कुटुंबीय महिला गाडीतून हात जोडून त्या रिक्षा चालकाकडे मारू नका अशी विनंती करत आहेत. 'माफ कर दो भाई' असं म्हणत कारचालकाने हात जोडल्यानंतरही रिक्षा चालक मागे हटत नाहीये. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे बेशिस्त रिक्षा चालकाचा माज दिसून येतोय.

या घटनेत, एक कुटुंब धूलिवंदन साजरे करून कारने (डीएल 12, सीएन 2823) घरी परतत असताना, शालिमार चौकात संशयित रिक्षाचालक मजहर अन्वर खान (रा. कथडा, जुने नाशिक, भद्रकाली) व त्याच्या साथीदाराने संबंधित कुटुंबीयांशी हुज्जत घातली. चौकात बेकायदेशीरपणे ऑटोरिक्षा (एमएच 15, जेए 3504) उभी करून रिक्षाचालक मजहरने संबंधितांशी दादागिरी केली. तसेच चालकाच्या बाजूने असलेली कारची काच फोडून मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी कारचालकाने मजहरची माफी मागितली. मात्र, अशातही त्याने मारहाण सुरूच ठेवली. यावेळी कारमध्ये बसलेली मुलगी हात जोडून गयावया करीत, 'मारू नका, माफी मागते' अशी वारंवार विनंती करत होती. तरीदेखील मुजोर रिक्षाचालक मजहर मारहाण करीत होता. धक्कादायक बाब म्हणजे उपस्थित नागरिकांनीही 'मारू नको, त्या व्यक्तीची फॅमिली सोबत आहे.' असे मजहरला समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अशातही तो मारहाण करीतच होता.

हेही वाचा - मृत घोषित केलेलं बाळ टिचकीवर जिवंत! नंदुरबारमध्ये चमत्कारीत घटना

अशा रिक्षा चालकावर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे. कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून रिक्षा चालकाने फोर व्हीलरच्या समोर रिक्षा अडवी घातली आणि गाडी चालवणाऱ्या तरुणाला शिव्या देत मारहाण सुरू केली. रिक्षा चालक गाडीतल्या तरुणाला खाली खेचत होता. याच वेळी गाडीतला तरुण हात जोडून माफी मागत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. गाडीतली महिला देखील 'विषय सोडून द्या' असं म्हणत हात जोडत आहे. तरी देखील रिक्षा चालक काही थांबताना दिसत नाहीये. उलट तो शर्टाच्या बाह्या मागे सारत हाणामारी करण्याच्या पवित्र्यात दिसत आहे.
शालिमार चौकातल्या रिक्षा चालकासोबत त्याचे काही इतर सहकारीही त्या कारभोवती वेढा घालून उभे होते. ही झुंडशाही नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केली आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर झोपेतून जागे झालेल्या पोलिसांनी रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

नाशिक शहरात रिक्षा चालकांकडून अनेक वेळा कार चालकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. भर रस्त्यात रिक्षा उभ्या करणे, इतर वाहन चालकांशी हुज्जत घालत भांडण करणे असे प्रकार अनेक वेळा घडल्याचे दिसून आले आहे. याशिवाय, वेळी-अवेळी रिक्षातील प्रवाशांशी वाद घालून त्यांच्याकडून जास्तीचे पैसे वसूल केले जात आहेत. बेशिस्त आणि अनधिकृतपणे कुठलाही परवाना नसताना प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर तसेच, विनाकारण गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.

हा संपूर्ण प्रकार उपस्थित नागरिकांनी मोबाइलमध्ये कैद केला. तसेच समाज माध्यमांवर व्हायरल केला. व्हायरल व्हिडिओची दखल घेत, पोलिस हवालदार नंदकिशोर मगर (45, भद्रकाली पोलिस ठाणे) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित मजहर खान व त्याच्या साथीदाराविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा - औरंग्याच्या कबरीवरून वाद: विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक; 17 मार्चला आंदोलन

रिक्षाचालकाची धिंड काढा
दहशत पसरविणाऱ्या आरोपींची पोलिसांकडून परिसरात धिंड काढली जाते. मग, संशयित रिक्षाचालक मजहर खान याची धिंड का काढली जात नाही. त्यानेदेखील परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याची परिसरात धिंड काढावी तसेच त्याचा रिक्षा परवाना रद्द करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.


सम्बन्धित सामग्री