Sunday, August 31, 2025 07:02:50 AM

गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 18 संचालक पदासाठी आज मतदान

गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण 18 संचालका पदांसाठी आज मतदान घेण्यात येत आहे. या निवडणुकीत गोंदिया जिल्ह्यात एकूण 11 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली.

गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 18 संचालक पदासाठी आज मतदान

गोंदिया: गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण 18 संचालका पदांसाठी आज मतदान घेण्यात येत आहे. या निवडणुकीत गोंदिया जिल्ह्यात एकूण 11 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, एकूण 894 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ही निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी, यासाठी जिल्हा सहकार निबंधक विभागाने योग्य नियोजन केले आहे. गोंदिया जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी जिल्हा बँकेची निवडणूक महत्त्वपूर्ण समजली जाते. जिल्हा बँकेचे एकूण 20 संचालक असून, त्यापैकी माजी आमदार राजेंद्र जैन आणि प्रफुल्ल अग्रवाल यांची बिनविरोध निवड झाल्याने आता प्रत्यक्षात 18 संचालक पदांसाठी ही निवडणूक होत आहे.

जिल्हा बॅंक निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सहकार पॅनल तयार करून ही निवडणूक लढवत आहे. तर काँग्रेस इतर पक्षांसह परिवर्तन पॅनल तयार करून निवडणूक रिंगणात आहे. ही निवडणूक खासदार प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिष्ठेची केली आहे. तर भाजप नेत्यांनी सुद्धा या निवडणुकीत पूर्णपणे जोर लावला आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.

हेही वाचा: मंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते विद्युत ट्रॅक्टरचे उद्घाटन होणार

जिल्हा बँकेसाठी आज मतदान....
11 मतदान केंद्रांवरून 894 मतदार बजावणार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 18 संचालक पदांसाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी जिल्हा सहकार निबंधक विभागाने योग्य नियोजन केले आहे. 

गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण 18 संचालका पदांसाठी आज सकाळी 8 ते दुपारी 4 यावेळेत मतदान घेण्यात येतआहे. या निवडणुकीत गोंदिया जिल्ह्यात एकूण 11 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, एकूण 894 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ही निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी, यासाठी जिल्हा सहकार निबंधक विभागाने योग्य नियोजन केले आहे.


सम्बन्धित सामग्री