Sunday, August 31, 2025 02:09:26 PM

महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराडचा हात; बाळा बांगर यांचा आरोप

हादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप विजयसिंह ऊर्फ बाळा बांगर यांनी केला आहे. वाल्मिक कराडची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे.

महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराडचा हात बाळा बांगर यांचा आरोप

बीड: महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप विजयसिंह ऊर्फ बाळा बांगर यांनी केला आहे. वाल्मिक कराडची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. मात्र जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही. 

संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडची आणखी एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे. या कॉल रेकॉर्डिंग ची पुष्टी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी करत नाही. संतोष देशमुख यांचा खून झाल्याची माहिती वाल्मिक कराड याला आधीच कशी काय होती? महादेव मुंडे खून प्रकरणात देखील वाल्मीक कराड याचा हात असल्याचा आरोप आता होत आहे. 

पैशाच्या व्यवहारातून वाल्मिक कराडने एका तरूणाला जातीवाचक शिवीगाळ केल्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. आता सगळ्यांनाच मध्ये घेतो.. तु कोण रे कुत्रा.. अशा प्रकारची भाषा वापरत जातीवाचक शिवीगाळ केली आहे. समोरच्या व्यक्तीने कामासाठी लाखो रुपये दिले होते. मात्र ते वाल्मिक कराड परत देत नसल्याने तरुणाने वारंवार फोन केल्याची माहिती आहे. याचाच वाल्मिक कराडला राग आला आणि त्याने थेट जातीवाचक शिवीगाळ केली. याचीच एक धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे.

हेही वाचा: सहा महिन्यात पाचशे शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

बाळा बांगर यांनी कराडबद्दल केले धक्कादायक खुलासे
या कॉल रेकॉर्डिंग संदर्भात विजयसिंह (बाळा) बांगर यांनी बोलताना सांगितले की, एका व्यक्तीने वाल्मिक कराडकडे कामासाठी दहा लाख रुपये दिले होते. ते दहा लाख रुपये परत मागण्यासाठी संबंधित व्यक्तीने वाल्मिक कराडला फोन केला असता त्यांना पैसे देणे ऐवजी शिवीगाळ करून धमक्या दिल्या आहेत. ते पीडित कुटुंबीय समोर यायला तयार नाही. वाल्मिक कराडची दहशत जिल्ह्यामध्ये असल्यामुळे कोणी समोर येत नाही. मात्र हा धक्कादायक प्रकार आहे. या संदर्भात मी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून ही कॉल रेकॉर्डिंग देणार असल्याचं बाळा बांगर यांनी सांगितले आहे. एवढेच नाही तर माझ्यासह माझ्या कुटुंबाला फार त्रास दिला. माझ्या आईला बीड पोलिसांनी पहाटे अटक केली. रुग्णालयात असताना तिला अंबेजोगाईला रुग्णालयात हलवण्याची तयारी सुरू केली होती. अतिशय कठीण प्रसंगातून माझ्यासह अनेक कुटुंब गेली आहेत. हळूहळू मी त्याच्या संदर्भातले खुलासे करणार असल्याचे देखील बाळा बांगर यांनी म्हटले आहे.

दिल्लीत असताना मला 9 डिसेंबरला काही व्यक्ती भेटले, त्यांनी मला फोन लावून दिला त्यावर वाल्मीक कराड बोलत होता. त्यावेळी त्याने काय नेते.. काय युवराज.. तुमचाच एक मित्र सरपंच परिषद खल्लास असे म्हणाला.. वाल्मिक कराड याला साडेपाच वाजताच सरपंच देशमुख यांची हत्या झाली? हे कसे काय माहिती होते? असा प्रश्न देखील बाळा बांगर यांनी उपस्थित केला आहे. तसेच महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात देखील वाल्मिक कराडचाच हात असल्याचा आरोप बाळा बांगर यांनी केला आहे.


सम्बन्धित सामग्री