Wednesday, August 20, 2025 08:37:18 PM

हवामान खात्याने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना 'हा' अलर्ट दिला आहे? पाहाच

अनेकांना प्रश्न पडला असेल की हवामान खात्याने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट दिला आहे? चला तर सविस्तर जाणून घेऊया.

हवामान खात्याने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना हा अलर्ट दिला आहे पाहाच

मुंबई: हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याचे क्षेत्र तयार होत असल्यामुळे गुरुवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. तसेच, याचा परिणाम महाराष्ट्रात दिसू शकतो. नुकताच, शनिवारी रात्री मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला होता. अशातच अनेकांना प्रश्न पडला असेल की हवामान खात्याने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट दिला आहे? चला तर सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: रात्रभर झालेल्या पावसामुळे मेंढ्यांचे हाल; ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत

'या' जिल्ह्यांना 'हा' अलर्ट:

हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना 'रेड अलर्ट', 'यलो अलर्ट' आणि 'ऑरेंज अलर्ट' जारी केले आहेत.

यलो अलर्ट: मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नागपूर आणि इतर अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

रेड अलर्ट: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे.

ऑरेंज अलर्ट: पुणे, सातारा, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

हेही वाचा: नवी मुंबईतील महिलेच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पतीनेच दिली होती सुपारी

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच, पुणे शहरात दहा वर्षांतील सर्वाधिक पाऊस पडला आहे. 1 मे ते 21 मे दरम्यान 110 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी 2015 मध्ये 106 मिमी पावसाची नोंद झाली होती. हवामान खात्याने पुढील दोन दिवसांत आणखी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.


सम्बन्धित सामग्री