Thursday, August 21, 2025 01:36:55 AM

दिग्गजांना संधी नाही, शरद पवार यांची शशिकांत शिंदे यांनाच पसंती का?

पश्चिम महाराष्ट्रातील बडे नेते शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष झालेत. पण पक्षात दिग्गज नेते असतानाही शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या नावालाच का पसंती दिली?

दिग्गजांना संधी नाही शरद पवार यांची शशिकांत शिंदे यांनाच पसंती का
शशिकांत शिंदे शरद पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई : शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवली आहे. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पवार गटात 'शिंदे'शाही अवतरली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बडे नेते शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष झालेत. पण पक्षात दिग्गज नेते असतानाही शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या नावालाच का पसंती दिली?

शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच राजकारणाला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी पक्षात आणि राज्यात अनेक पदं भूषवली. शरद पवार यांच्या जवळचे अशी पक्षात ओळख निर्माण झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरही अनेक दिग्गज नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि अजित पवारांसोबत गेले. पण शशिकांत शिंदेंनी शरद पवारांनाच साथ दिली. पडत्या काळातही शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. 

2024 च्या निवडणुकीआधी पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड होता, पण लोकसभेपाठोपाठ विधानसभेत हा गड ढासळला. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची ताकद पुन्हा वाढवण्यासाठी शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा देण्यात आली. शशिकांत शिंदे हे ग्रामीण भागातून येतात त्यामुळे त्यांची ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली आहे. त्याचबरोबर शहरी भागातील प्रश्नांनाचीही त्यांना जाण आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीही उपयुक्त चेहरा म्हणून शिंदेंची नियुक्ती करण्यात आली आहे. 

शशिकांत शिंदे यांचं वक्तृव्य कौशल्य चांगलं आहे. एक उत्कृष्ट वक्ता अशी त्यांची ओळख आहे. तसेच राजकारणात थेट भिडणारा नेता अशी शशिकांत शिंदे यांची ओळख आहे. कोणत्याही नेत्याला थेट भिडण्याची, अंगावर घेण्याची ताकद शशिकांत शिंदेंमध्ये आहे. तसेच शशिकांत शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले पण ते आरोप निराधार होते.  त्यामुळेच शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या नावाला पसंती दिल्याचं बोललं जातंय.

शशिकांत शिंदे यांची कारकीर्द

माथाडी कामगार नेते म्हणून शशिकांत शिंदे यांची ओळख.
शरद पवार गटाचे विधानपरिषदेतील आमदार, तसेच मुख्य प्रतोद
1999 मध्ये जावळी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व
कृष्णा खोरे जलसिंचन महामंडळात जल संधारण मंत्री
2009 ते 20214 कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार
2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या महेश शिंदेंकडून पराभव
2024 च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसलेंविरोधात निवडणूक, पण 32 हजार मतांनी पराभव


सम्बन्धित सामग्री