महाराष्ट्र: अर्थसंकल्प सादर करतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक घोषणा केल्या. त्यातच आता शेतकऱ्यांची कर्ज माफी होणार की नाही याबाबत अजित पवार जरा स्पष्टच बोललेत. विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला घवघवीत यासह मिळालं. यानंतर शेतकऱ्यांचा कर्ज माफीचा प्रश्न होता. त्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत भाष्य केलंय.
हेही वाचा: अर्थसंकल्पात लावलेला 'तो' कर मागे
काय म्हणाले अजित पवार?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, विधानसभा निवडणुकीत काही गोष्टी घडल्या होत्या. आर्थिक शिस्त गरजेची असते. त्याप्रमाणे मी अर्थसंकल्प सादर केला. विरोधकांनी जी टीका करायची ती केली. आम्ही वास्तववादी भूमिका घेऊन अर्थसंकल्प सादर केला. सर्व धर्माचे लोक एकत्र राहण्याची ही आपली परंपरा आहे. शिवाजी महाराजांनी शिकवण आपल्याला दिली आहे. त्या शिकवणी मधून आपण पुढे जात आहोत असे अजित पवार यांनी म्हटले.
त्याचबरोबर अजित पवार यांन म्हटले की, काहींनी निवडणूक आधी कर्जमाफीचे बोलले होते. मी राज्यातल्या जनतेला सांगतो 31 तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा. जे आधी सांगितलं होतं ते प्रत्यक्षात येत नाही. आता कर्जमाफी देण्यासारखी तशी परिस्थिती नाही. भविष्यातील परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ. या वर्षी आणि पुढच्या वर्षीची पीक कर्जमाफी होणार नाही तशी आपली परिस्थिती नसल्याचे अजित पवारांनी म्हटले.