सातारा : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप करणारी महिला गोत्यात आली आहे. आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. सातारा पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
जयकुमार गोरे यांना प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांच्या खंडणीची आरोप करणाऱ्या महिलेने मागणी होती. दरम्यान 1 कोटीच्या खंडणीची रक्कम स्वीकारताना महिलेला अटक केली आहे. सातारा पोलिसांनी गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेवर कारवाई केली आहे. सातारा गुन्हे शाखेने या प्रकरणाचा पडदा फाश केला होता.
हेही वाचा : सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलीस मारहाणीतच; न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर ठपका
सत्ताधाऱ्यांवर कुणी तक्रार केली तर तक्रारदारावरच कारवाई होते. गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेच्या अटकेवर प्रहारच्या बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्याय कसा सत्तेभोवती फिरतो याचं उत्तम उदाहरण असल्याचे यावेळी बच्चू कडू यांनी म्हटले आहे. अलीकडच्या काळातील प्रकरणे पाहिली तर विरोधकांचे असेल तर तक्रार करणाऱ्याच्या बाजूने कारवाई होते. सत्ताधाऱ्यातील असेल तर तक्रारदारावरच कारवाई होते. मागील 10 - 20 वर्षातील हे चित्र असल्याचं बच्चू कडू म्हणाले आहेत. मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली. यावर बच्चू कडू यांनी भाष्य केले आहे.
नेमकं प्रकरण काय?
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर नग्न फोटो पाठवल्याचा गंभीर आरोप एका महिलेने केला होता. यानंतर समाज माध्यमांमध्ये खळबळ उडाली होती. मंत्री गोरे यांनी पुन्हा त्रास द्यायला सुरूवात केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला होता. दरम्यान अधिवेशनामध्ये मंत्री जयकुमार गोरेंवर झालेल्या आरोपांमुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती. संबंधित महिलेने उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले होते. जयकुमार गोरे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणात महिलेने गोरेंवर गंभीर आरोप केले होते. मला सहा वर्षांमध्ये मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी त्रास दिला, मी कलेक्टर आणि पोलीस अधीक्षकांना सर्व माहिती सांगितली, परंतु माझी कोणी दखल घेतली नाही. या गोष्टीचा तपास करण्यासाठी पोलीसही आले नसल्याचा आरोप महिलेने केला होता. दरम्यान आता जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने प्रकरण दाबण्यासाठी तीन कोटींच्या खंडणीची मागणी केली होती आणि एक कोटी घेत असताना पोलिसांनी तिला अटक केली आहे.