भारत देशात अशे अनेक उद्योजक आहेत, ज्यांनी अपार कष्ट करून, मेहनत करून वेगळ्याच उंचीवर पोहोचले. रतनजी टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी, सायरस पूनावाला, यासारखे भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक आपल्या डोळ्यासमोर येतात. ज्याप्रमाणे भारताच्या आर्थिक विकासात या श्रीमंत उद्योजकांचे योगदान आहे त्याचप्रमाणे भारतात अशा अनेक प्रसिद्ध महिला उद्योजिका आहेत, ज्यांनी भारताच्या आर्थिक विकासामध्ये मोलाचे योगदान दिले. सूत्रांनुसार, आज भारतातील 20% उद्योग हे महिलांच्या मालकीचे आहेत. 2024 च्या हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये भारतातील टॉप-10 स्वयंनिर्मित महिला उद्योजिकांची यादी जाहीर केली होती. चला तर जाणून घेऊया कोण आहेत त्या श्रीमंत महिला उद्योजिका, ज्यांनी भारताला आज एका वेगळ्याच उंचीवर आणले.
हेही वाचा: PM Internship Scheme 2025 Registration: पीएम इंटर्नशिपसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करू शकता
1 - राधा वेम्बू:
राधा वेम्बू झोहो कॉर्पोरेशनच्या (Zoho) को-फाऊंडर असून त्या भारतातील सर्वाधिक श्रीमंत महिला उद्योजिकांच्या यादीत समाविष्ट आहे. राधा वेम्बू यांनी श्रीमंतीच्या बाबतीत नायकाच्या ( Nykaa ) संस्थापिका आणि सीईओ फाल्गुनी नायर यांनादेखील त्यांनी मागे टाकले. 2024 च्या हुरुन इंडिया रिच लिस्टच्या आकडेवारीनुसार, राधा वेम्बू यांची एकूण संपत्ती 47,000 कोटींपेक्षा अधिक आहे.
2 - फाल्गुनी नायर:
फाल्गुनी नायर या नायकाच्या ( Nykaa ) संस्थापिका आणि सीईओ आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, फाल्गुनी नायरची एकूण संपत्ती पेटीएमचे (Paytm) सीईओ विजय शेखर शर्मा यांच्यापेक्षा चौपट आहे. 2024 च्या हुरुन इंडिया रिच लिस्टच्या आकडेवारीनुसार,फाल्गुनी नायरची एकूण संपत्ती 32,000 कोटींपेक्षा अधिक आहे.
हेही वाचा: 'ही' भारतीय महिला वयाच्या 27 व्या वर्षी बनली कंपनीची CEO; कोट्यवधींच्या संपत्तीसह ईशा अंबानीला टाकले मागे
3 - जयश्री उल्लाल:
जयश्री उल्लाल भारतीय वंशाच्या अब्जाधीश उद्योजिका आहेत. जयश्री उल्लाल अरिस्ता नेटवर्क्स (Arista Network) या क्लाउड नेटवर्किंग कंपनीच्या अध्यक्ष आणि सीईओ आहेत. 2024 च्या हुरुन इंडिया रिच लिस्टच्या आकडेवारीनुसार, जयश्री उल्लाल यांची एकूण संपत्ती 32,000 कोटींपेक्षा अधिक आहे.
4 - किरण मजूमदार-शॉ:
किरण मजूमदार-शॉ एक भारतीय अब्जाधीश उद्योजिका आहेत. किरण मजूमदार-शॉ या बायोकॉन (Biocon) कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापिका आहेत. 2024 च्या हुरुन इंडिया रिच लिस्टच्या आकडेवारीनुसार, किरण मजूमदार-शॉ यांची एकूण संपत्ती 29,000 कोटींपेक्षा अधिक आहे.