Fake Currency Note Rules: चुकून तुमच्याकडे बनावट नोट आली तर काय करायचं? असा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला असेल? आज याचं प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. खरं तर दिल्लीतील एका न्यायालयाने 2 हजार रुपयांच्या बनावट नोटा बाळगल्याच्या आणि वापरल्याच्या 4 वर्षे जुन्या प्रकरणात दोन जणांना दोषी ठरवले आहे. न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम 489 ब (खऱ्या, बनावट किंवा बनावट चलनी नोटा किंवा बँक नोटा वापरणे) आणि 489 क (बनावट किंवा बनावट चलनी नोटा बाळगणे) अंतर्गत कारवाई केली आहे.
या दोघांकडून 2 हजार रुपयांच्या 29 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. फक्त बनावट नोट छापणे किंवा त्या वापरणे किंवा ती बनावट आहे हे माहीत असूनही ती वापरण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला 7 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो? याबद्दल संपूर्ण नियम काय आहे ते जाणून घेऊयात. भारतात बनावट नोटा वापरणे, बनवणे, वापरणे करणे किंवा बाळगणे यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. हा एक गंभीर गुन्हा आहे आणि भारतीय दंड संहिता (IPC), 1860 आणि इतर कायदेशीर तरतुदींनुसार, यासाठि दंड ठोठावला जाऊ शकतो.
हेही वाचा - वडील मृत्युपत्र न लिहिता मरण पावले तर, मालमत्तेचे विभाजन कसे होणार? कायदा काय सांगतो? जाणून घ्या
बनावट नोटा बनवल्यास होऊ शकते 10 वर्षांची शिक्षा -
कलम 489अ नुसार, बनावट नोटा बनवल्यास जन्मठेपेची शिक्षा किंवा 10 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि दंड होऊ शकतो.
बनावट नोटा वापरल्यास जन्मठेपेची शिक्षा -
कलम 489ब नुसार, बनावट नोटा वापरणे किंवा त्या सर्कयुलेट केल्यास जन्मठेपेची शिक्षा किंवा 10 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि दंड होऊ शकतो. तसेच कलम 489क नुसार, बनावट नोटा बाळगणे किंवा त्यांच्यासोबत पकडले गेल्यास (जर असे सिद्ध झाले की त्या व्यक्तीला त्या बनावट असल्याची माहिती होती) 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.
बनावट नोटा छापण्यासाठी 10 वर्षांपर्यंतची शिक्षा -
कलम 489 ड नुसार, बनावट नोटा छापण्यासाठी उपकरणे किंवा प्लेट्स बनवणे किंवा जवळ ठेवल्यास जन्मठेपेची शिक्षा किंवा 10 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि दंड होऊ शकतो. तसेच कलम 489ई नुसार, खऱ्या चलनी नोटांसारख्या जाहिराती, कागदपत्रे किंवा साहित्य छापल्यास 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकतो.
याशिवाय, जर बनावट नोटा देशविरोधी कारवायांमध्ये वापरल्या जात असतील तर दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत (UAPA, PMLA) देखील कारवाई केली जाऊ शकते. बनावट चलनाशी संबंधित प्रकरणांची चौकशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कायदा, 1934 अंतर्गत केली जाऊ शकते.
हेही वाचा - 'ही' सरकारी योजना देते FD पेक्षा जास्त परतावा; 31 मार्चपर्यंतचं करू शकता गुंतवणूक
बनावट नोट मिळाल्यास काय करावे?
आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हालाही चुकून बनावट नोट मिळाली तर ताबडतोब जवळच्या बँकेला किंवा पोलिसांना कळवा. इतर कोणालाही बनावट नोटा देणे किंवा वापरणे टाळा. कारण हा देखील एक दंडनीय गुन्हा आहे. बँक बनावट नोट जप्त करून त्याबद्दल पोलिस आणि आरबीआयला माहिती देते. त्यामुळे बनावट नोट मिळाल्यासं तुम्ही सर्तक असणं आवश्यक आहे.