CIBIL Score: प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीसाठी त्याचा CIBIL स्कोअर किती महत्त्वाचा असतो, हे तेव्हाचं समजते, जेव्हा तो एखाद्या बँकेकडून कर्ज घेण्यासाठी जातो. बहुतेक लोकांना CIBIL स्कोअरचे महत्त्व समजत नाही. CIBIL स्कोअरमुळे संबंधित व्यक्तीचा क्रेडिट इतिहास आणि पेमेंट सवयी समजतात. प्रत्येक व्यक्तीने चांगला CIBIL स्कोअर राखणे खूप महत्वाचे आहे. परंतु बरेच लोक त्यांच्या CIBIL स्कोअरबद्दल गंभीर नसतात, ज्यामुळे त्यांचा CIBIL स्कोअर सतत खराब होत जातो. यामुळे त्यांना भविष्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते.
चांगला CIBIL स्कोअर असल्याने, तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊन भविष्यात तुमच्या आर्थिक गरजा सहजपणे पूर्ण करू शकता. परंतु, जर तुमचा CIBIL स्कोअर खराब असेल, तर तुम्ही कठीण काळात बँकेकडून कर्ज घेऊ शकणार नाही. प्रत्येक व्यक्तीने आपला CIBIL स्कोअर चांगला ठेवणे खूप महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशा चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्या तुमच्या CIBIL स्कोअरवर थेट परिणाम करतात. चला तर मग कोणत्या चुका आहेत, ज्याचा तुम्हाला भविष्यात पश्चाताप होऊ शकतो, ते जाणून घेऊयात...
हेही वाचा - भारतातील 'या' टॉप 5 सर्वात श्रीमंत महिला युट्यूबर्स तुम्हाला माहित आहेत का? त्यांची एकूण संपत्ती ऐकून व्हाल अवाक!
क्रेडिट कार्ड बिल आणि EMI वेळेवर न भरणे -
तुमच्या कर्जाचा ईएमआय किंवा क्रेडिट कार्ड बिल वेळेवर न भरल्याने तुमच्या सिबिल स्कोअरवर थेट परिणाम होतो. त्यामुळे नेहमी तुमच्या कर्जाचे ईएमआय आणि क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरा.
एकाच वेळी अनेक कर्जे घेणे -
एकापेक्षा जास्त कर्जे घेतल्यानेही तुम्हाला अडचण येऊ शकते. तुमच्यावर एकापेक्षा जास्त कर्ज असतील तर बँक तुम्हाला कर्ज देताना विचार करेल. तसेच एकापेक्षा अधिक कर्जाचा EMI न भरल्यास त्याचा थेट तुमच्या CIBIL स्कोअरवर परिणाम होईल.
क्रेडिट कार्डचा योग्य वापर न करणे -
जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरणारे असाल तर तुम्ही अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. तुमच्या क्रेडिट कार्ड मर्यादेपेक्षा जास्त खर्च करू नका. त्याच वेळी, नेहमी क्रेडिट कार्ड मर्यादेच्या फक्त 30 टक्के खर्च करण्याचा प्रयत्न करा. क्रेडिटचा जास्त वापर तुमचा CIBIL स्कोअर खराब करू शकतो.
हेही वाचा - SBI कडून गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! बँकेने
वारंवार कर्जासाठी अर्ज करणे -
जेव्हा तुम्ही कर्जासाठी अर्ज करता तेव्हा बँक तुमचा CIBIL स्कोअर तपासते. त्यामुळे वारंवार अर्ज केल्याने तुमचा CIBIL स्कोअर देखील कमी होऊ शकतो.
क्रेडिट कार्डसाठी वारंवार अर्ज करणे किंवा क्रेडिट कार्ड बंद करणे -
क्रेडिट कार्डसाठी वारंवार अर्ज केल्याने तुमचा CIBIL स्कोअर देखील खराब होऊ शकतो. तसेच जर तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड बंद केले तर तुमचे क्रेडिट वापर प्रमाण वाढते आणि तुमचा CIBIL स्कोअर कमी होतो.