Sunday, August 31, 2025 09:37:59 PM

रेल्वे प्रवाशांसाठी 'बेस्ट'ची धाव; मेगाब्लॉकदरम्यान बेस्ट बसची विशेष सोय

पश्चिम रेल्वेवर महत्त्वाच्या देखभाल व पुलांच्या दुरुस्तीमुळे शुक्रवारी 11 एप्रिल आणि शनिवारी 12 एप्रिल रोजी दोन दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला असून

रेल्वे प्रवाशांसाठी बेस्टची धाव मेगाब्लॉकदरम्यान बेस्ट बसची विशेष सोय

मुंबई: पश्चिम रेल्वेवर महत्त्वाच्या देखभाल व पुलांच्या दुरुस्तीमुळे शुक्रवारी 11 एप्रिल आणि शनिवारी 12 एप्रिल रोजी दोन दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला असून या कालावधीत माहिम ते वांद्रे दरम्यान नव्या पूलाच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे एकूण 344 लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत, त्यामुळे लाखो प्रवाशांवर परिणाम होणार आहे.

या कालावधीत अप व डाउन स्लो व फास्ट मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे. परिणामी प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून BEST प्रशासनाने विशेष बस सेवा उपलब्ध करून दिली आहे.

हेही वाचा: मुंबईकरांनो, सावधान! पश्चिम रेल्वेवर दोन दिवस मेगाब्लॉक; 344 लोकल रद्द, वेळापत्रक बघूनच बाहेर पडा

 प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी 'बेस्ट'चं विशेष प्लॅनिंग
शनिवारी व रविवारी सकाळी 6 ते सकाळी 9 या वेळेत विविध BEST आगारांमधून एकूण 18 विशेष बस सोडण्यात येणार आहेत. हे बसमार्ग प्रवाशांना लोकलची पर्यायी सोय करून देतील.

मुख्य मार्ग:

बेस्ट मार्ग क्रमांक 4: खोडादाद सर्कल - अंधेरी रेल्वे स्थानक (प.) दरम्यान सहा बस

बेस्ट मार्ग क्रमांक  सी-1: सांताक्रुझ आगार – दादर दरम्यान तीन बस 

बेस्ट मार्ग क्रमांक 83: सांताक्रुझ – कुलाबा बस स्थानकादरम्यान दोन बस 

बेस्ट मार्ग क्रमांक 225: वांद्रे – दिंडोशीदरम्यान  तीन बस 

बेस्ट मार्ग क्रमांक ए 01: गोराई – माहिम दरम्यान दोन बस 

बेस्ट मार्ग क्रमांक 33 गोरेगाव – वरळी  बस स्थानकादरम्यान दोन बस धावतील 

या विशेष बस सेवा अंधेरी, वडाळा, सांताक्रुझ, वांद्रे, गोरेगाव, बोरिवली इत्यादी ठिकाणी सहज उपलब्ध असणार आहेत.
 


सम्बन्धित सामग्री