Wednesday, September 03, 2025 04:46:40 PM

मुंबई पूर्व उपनगरात आज पाणीपुरवठा बंद; 'या' भागात पाणीपुरवठा बंद राहणार

मुंबई पूर्व उपनगरात आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे. भांडुपमध्ये जलवाहिनी जोडण्याचं काम असल्यानं मुंबई पूर्व उपनगरात आज पाणीपुरवठा होणार नाही.

मुंबई पूर्व उपनगरात आज पाणीपुरवठा बंद या भागात पाणीपुरवठा बंद राहणार

मुंबई : मुंबई पूर्व उपनगरात आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे. भांडुपमध्ये जलवाहिनी जोडण्याचं काम असल्यानं मुंबई पूर्व उपनगरात आज पाणीपुरवठा होणार नाही. 

मुंबई पूर्व उपनरातील भांडुपमध्ये जलवाहिनी जोडण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे नाहूर, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळीत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जल जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत  होणार आहे. तसेच पाण्याचा पुरेसा साठा करून पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने नागरिकांना केले आहे. 

हेही वाचा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण; महाराष्ट्रातील कोणत्या मान्यवरांचा समावेश?

आज पूर्व उपनगरातील काही भागात पाणीपुरवठा बंद असणार आहे. भांडुप पूर्वेतील चामुंडा नगरच्या 900 मिमी x 900 मिमी जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे सकाळी 11:30 नंतर पाणीपुरवठा राहणार बंद आहे. आज नाहूर स्थानक (पूर्व), भांडुप (पूर्व), कांजूरमार्ग (पूर्व), विक्रोळी (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा बंद राहील. जल जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे. तसेच पाण्याचा पुरेसा साठा करावा आणि पाणी जपून वापरावे असे आवाहन मुंबई महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे. 


सम्बन्धित सामग्री