मयुरी देवरे. मुंबई: मुंबई पश्चिम उपनगरातील अंधेरी येथील रहिवाशांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. अंधेरीतील काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अंधेरी पश्चिम येथील वांद्रे जलवाहिनीवरील फ्लो कंट्रोल वॉल्व्ह दुरुस्त करण्यासाठी आणि वेसावे जलवाहिनीवरील बटरफ्लाय वॉल्व्ह बदलण्याच्या कामांमुळे गुरुवार, 19 जून दुपारी 2 वाजल्यापासून शुक्रवारी, 20 जून मध्यरात्री 1 वाजेपर्यंत म्हणजेच सुमारे 11 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
'या' भागातील पाणीपुरवठा बंद राहणार:
गुरुवारी पार्ले पश्चिमेकडील लल्लूभाई उद्यान, लोहिया नगर, पार्ले गावठाण, मीलन भूयारी मार्ग, जुहू विलेपार्ले विकास योजना, जुहू गावठाण क्रमांक 3, व्ही. एम. मार्ग, मोरागाव, जुहू गावठाण क्रमांक 1 आणि 2, जुहू गल्ली, धनगरवाडी, सागर सिटी सोसायटी या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.