Friday, September 19, 2025 07:18:52 PM

Shardiya Navratri 2025: या नवरात्रोत्सवात दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी करा 'हे' 10 प्रभावी उपाय; मिळेल देवीची विशेष कृपा

शारदीय नवरात्रौत्सव हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण आहे, ज्यामध्ये देवीचे पूजन आणि उपासना केली जाते.

shardiya navratri 2025 या नवरात्रोत्सवात दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी करा हे 10 प्रभावी उपाय  मिळेल देवीची विशेष कृपा

Shardiya Navratri 2025: शारदीय नवरात्रौत्सव हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण आहे, ज्यामध्ये देवीचे पूजन आणि उपासना केली जाते. देवी दुर्गा शक्ती, सृजन आणि विनाश यांचा संगम असून वाईट शक्ती नष्ट करून भक्तांचे जीवन सुख, शांती आणि समृद्धीने भरते. या नऊ दिवसांच्या उत्सवात नवदुर्गा, म्हणजेच दुर्गा देवीच्या नऊ रूपांचे विशेष पूजन केले जाते.

दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी काही साधे, पण प्रभावी उपाय आहेत, ज्याचा नियमित पालन केल्यास जीवनातील अडचणी, संकटे आणि नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते.

दुर्गा मातेला प्रसन्न करण्याचे मुख्य उपाय: 

नियमित पूजा
दररोज सकाळ आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावून दुर्गा मातेची पूजा करा. दिवा लावल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते.

उपवास करणे
नवरात्रीमध्ये नऊ दिवसांचा उपवास शक्यतो ठेवा. उपवासामुळे मनाची शांती वाढते आणि शरीर सुद्धा हलके राहते.

हेही वाचा: Shardiya Navratri 2025: शारदीय नवरात्रीत देवीची पूजा करताना ही फुले नक्की अर्पण करा

अखंड ज्योत पेटवा
घरात दुर्गा मातेच्या समोर अखंड ज्योत लावा, जी कधीही विजणार नाही. या ज्योतीमुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते.

नवार्ण मंत्राचा जप
ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे’ हा मंत्र रोज जपा. यामुळे मानसिक स्थैर्य, शक्ती आणि संरक्षण मिळते.

लाल रंगाचे आसन वापरा
दुर्गा मातेला लाल रंग आवडतो. पूजा करताना लाल रंगाचे आसन वापरल्यास देवी प्रसन्न होते.

जास्वंद किंवा लाल फुले अर्पण करावीत 
जास्वंद किंवा इतर लाल फुलांचे अर्पण करा. लाल रंग देवीची ऊर्जा आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे.

खीर आणि नैवेद्य 
दुर्गा मातेला खीर अत्यंत प्रिय आहे. यामुळे घरात समृद्धी व आनंद येतो.

कन्या पूजन
अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी पाच किंवा सात कन्यांचे पूजन करा, त्यांना जेवण आणि उपहार द्या. यामुळे देवीची कृपा वाढते.

हेही वाचा:Shardiya Navratri 2025: नवरात्रोत्सवाच्या आधी सूर्यग्रहणाचा अशुभ संकेत! शास्त्रांमध्ये दडलंय मोठं रहस्य; जाणून घ्या

श्रृंगार अर्पण
लाल साडी, हार, दागिने किंवा इतर श्रृंगार वस्तू अर्पित करा. यामुळे देवीच्या चरणी भक्तीची भावना दृढ होते.

आरती आणि दान
पूजेच्या शेवटी देवीची आरती करा आणि गरजू लोकांना दान-दक्षिणा द्या. यामुळे पुण्य मिळते आणि घरात सकारात्मक वातावरण राहते.

या उपायांचे पालन केल्यास भक्तांचे जीवन आनंद, स्वास्थ्य, शांती आणि समृद्धीने परिपूर्ण होते. नवरात्रीत दुर्गा मातेच्या आशीर्वादाने संकटे दूर होतात आणि घरामध्ये सुख-समृद्धी राहते.

सर्व भक्तांनी या नवरात्रीत नियमित पूजा, मंत्र जप आणि उपासना करून दुर्गा मातेला प्रसन्न करावे, ज्यामुळे त्यांचे जीवन सुखमय आणि संकटमुक्त बनेल.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)
 


सम्बन्धित सामग्री