Sunday, August 31, 2025 11:46:43 AM

खातेवाटप लवकरच जाहीर होण्याची शक्यता

नागपूर हिवाळी अधिवेशन संपताच राज्य मंत्री मंडळाचे खाते वाटप जाहीर होणार.राज्यपाल सी पी राधाकृष्णंन यांच्याकडे राज्य मंत्री मंडळ खाते वाटपाची यादी पोहचली.

खातेवाटप लवकरच जाहीर होण्याची शक्यता

मुंबई : नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या महायुती सरकारमधील खातेवाटपाचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतरही अनेक दिवसांपासून खातेवाटप रखडले आहे. यामुळे महायुतीतील भाजप, शिवसेना, आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना आपापल्या खात्यांच्या वाटपाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

 मात्र, आता मंत्र्यांची उत्कंठा न वाढवता खातेवाटप लवकरच होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आज झालेल्या महायुतीच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या पत्रकार परिषदे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटपाबाबत लवकरच निर्णय होईल लवकरच म्हणजे आजही होऊ शकतं किंवा उद्या सकाळी असा दावा केला आहे. 


महायुतीच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  विदर्भ आणि मराठवाड्यांसाठी अनेक योजना राबविण्याचा उल्लेख केला. शेतकऱ्यांना या योजनांचा फायदा होईल, अशी माहिती दिली. त्याचबरोबर, फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना सांगितले की, आगामी 3 वर्षात गडचिरोलीतील नक्षलवाद संपवला जाईल आणि महाराष्ट्रात नव्या नक्षलवाद्यांची भरती होत नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, विरोधकांवर प्रहार करत सर्व बॅट्समन एकत्र उतरवले आणि अशी बॅटिंग केली की विश्वचषक जिंकलो असे विधान करत विरोधकांना क्लीनबोल्ड केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली खातेवाटपावरील चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांच्या समतोल साधत खातेवाटप लवकरच जाहीर केले जाणार आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा

https://whatsapp.com/channel/0029Va9QJRHFSAt2p8b9Cx3t


सम्बन्धित सामग्री