Monday, September 01, 2025 04:24:09 AM

पोलिसांच्या प्रश्नांवर अंबादास दानवेंनी उठवला सभागृहात आवाज

समाजातील महत्त्वाचा घटक असलेल्या पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न, आरोग्य व्यवस्था आणि डिजी लोन इत्यादी प्रश्नांबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी सभागृहात आवाज उठविला.

पोलिसांच्या प्रश्नांवर अंबादास दानवेंनी उठवला सभागृहात आवाज

विजय चिडे. प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर: समाजातील महत्त्वाचा घटक असलेल्या पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न, आरोग्य व्यवस्था आणि डिजी लोन इत्यादी प्रश्नांबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी सभागृहात आवाज उठविला. 'पोलिसांच्या ड्युटीचा कालावधी 8 तासांचा असला तरीही त्यांना किमान 12 तास काम करावे लागते', असं दानवे म्हणाले. 

हेही वाचा: 'या' मराठमोळ्या बॉलिवूड अभिनेत्याच्या घरी स्वामी समर्थांच्या पादुकांचं पूजन

काय म्हणाले अंबादास दानवे?

'पोलिसांच्या ड्युटीचा कालावधी 8 तासांचा असला तरीही त्यांना किमान 12 तास काम करावे लागते. मुंबई पोलिस दलात काम करणारे अर्ध्याहून अधिक पोलिस अधिकारी मुंबईबाहेर राहत आहेत. वसई, विरार, नवी मुंबई, पनवेलपासून कर्जत, कसारापर्यंत पोलिसांचे वास्तव्य आहे. यामुळे त्यांना दिवसाचे किमान 16 ते 18 तास ड्युटी आणि प्रवासात घालवावे लागतात. त्यामुळे, अंबादास दानवे यांनी सभागृहात माहिती दिली की, 'आकडेवारीनुसार, बहुतेक पोलिसांचे मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने होतात, कारण योग आणि व्यायामासाठी वेळ नसतो'.

हेही वाचा: पोलिसांच्या त्रासाला कंटाळून बिल्डरने केली आत्महत्या

'पोलिसांच्या मूलभूत सुविधांकडे राज्य सरकारचे लक्ष नाही. पोलिसांच्या शासकीय घरांची दुरावस्था झाली असून मागील अनेक वर्षांपासून त्यांना डीजी लोन मिळत नाही. येत्या काळात राज्य सरकार या सर्व मुद्द्यांवर धोरण तयार करणार का?' असा प्रश्न दानवे यांनी सरकारला विचारत पोलिसांच्या प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधले.

'पोलिसांच्या मूलभूत सुविधांकडे राज्य सरकारचे लक्ष नाही. पोलिसांच्या शासकीय घरांची दुरावस्था झाली असून मागील अनेक वर्षांपासून त्यांना डीजी लोन मिळत नाही. आगामी काळात राज्य सरकार या सर्व विषयांवर धोरण आखणार आहेत का?', असा प्रश्न दानवे यांनी सरकारला विचारत पोलिसांच्या प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधले.
 


सम्बन्धित सामग्री