Wednesday, August 20, 2025 09:15:35 PM

विलास लांडेंना काय हवंय ?

अजित पवार भोसरी विधानसभेतून निवडणूक लढवणार असतील तर विलास लांडे यांना उमेदवारी मिळणार नाही. याच करणास्तव विलास लांडे यांनी पिंपरीत शरद पवार यांची भेट घेतली असून राशपात जाण्याच्या मार्गावर आहे का ?

विलास लांडेंना काय हवंय  

पुणे - भोसरी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सद्या विधानसभा निवडणूकवरून तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं बोललं जातंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नगरसेवक, पदाधिकारी राशपच्या संपर्कात असल्याचे दावे केले जातायेत. याचं मूळ कारण म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विलास लांडे हे विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत.

 

राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार हे बारामतीतून न लढता भोसरी विधानसभेतून लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार भोसरी विधानसभेतून निवडणूक लढवणार असतील तर विलास लांडे यांना उमेदवारी मिळणार नाही. याच करणास्तव विलास लांडे यांनी पिंपरीत शरद पवार यांची भेट घेतली असून राशपात जाण्याच्या मार्गावर आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शरद पवार हे अजित पवारांच्या बालकेकिल्यात भगदाड पाडण्याच्या तयारीत असल्याच्या देखील चर्चा केल्या जातायेत. 

भोसरी विधानसभेत सध्या विलास लांडे यांचा भाचा महेश लांडगे हे भाजपाचे आमदार आहेत, त्यामुळे जर विलास लांडे यांना विधानसभा निवडणूकीसाठी राशपकडून संधी मिळाली तर मामा भाच्याच्या नात्यात फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विलास लांडे यांनी राशपात प्रवेश केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसेल. भोसरी विधानसभा निवडणूकीत काय हालचाली होतील हे पाहणं महत्वाचं ठरेल.

 


सम्बन्धित सामग्री