मुंबई : महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज 15 डिसेंबरला पार पडणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आज 37 मंत्री शपथ घेणार आहेत. आज मंत्रिमंडळात शपथ घेणाऱ्या महायुतीतील आमदारांची नावे समोर आली आहेत.
भाजपाच्या वाट्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 20 मंत्रीपदे आली आहेत. शिवसेनेच्या वाट्याला एकनाथ शिंदेसह 12 मंत्रिपदे आली आहेत. मात्र आज शिवसेनेचे 11 मंत्री आज शपथ घेणार असल्याची माहिती आहे. तर राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवारांसह 8 मंत्री शपथ घेणार आहेत. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाकडून कोणत्या आमदारांना मंत्रिपदासाठी फोन करण्यात आला. पाहुयात संपूर्ण यादी....
भाजपाकडून कोणत्या नेत्यांना मंत्रिपद मिळणार?
1. नितेश राणे
2. शिवेंद्रराजे भोसले
3. चंद्रकांत पाटील
4. पंकज भोयर
5. मंगलप्रभात लोढा
6. गिरीश महाजन
7. जयकुमार रावल
8. पंकजा मुंडे
9. राधाकृष्ण विखे पाटील
10. गणेश नाईक
11. मेघना बोर्डीकर
12. अतुल सावे
13. जयकुमार गोरे
14. माधुरी मिसाळ
15. चंद्रशेखर बावनकुळे
16. संजय सावकारे
17. अशोक उईके
18. आकाश फुंडकर
19. आशिष शेलार
शिवसेनेकडून कोणत्या नेत्यांना मंत्रिपद मिळणार?
1. उदय सांमत
2. प्रताप सरनाईक
3. शंभूराज देसाई
4. योगश कदम
5. आशिष जैस्वाल
6. भरत गोगावले
7. प्रकाश आबिटकर
8. दादा भूसे
9. गुलाबराव पाटील
10. संजय राठोड
11. संजय शिरसाट
राष्ट्रवादी पक्षाकडून कोणत्या नेत्यांना मंत्रिपद मिळणार?
1. आदिती तटकरे
2. बाबासाहेब पाटील
3. दत्तमामा भरणे
4. हसन मुश्रीफ
5. नरहरी झिरवाळ
6. मकरंद पाटील
7. इंद्रनील नाईक