Wednesday, August 20, 2025 05:23:03 PM

मुख्यमंत्री फडणवीसांनी केले मुंबई महानगरपालिकेचे अभिनंदन

'विक्रोळी येथील लालबहादूर शास्त्री मार्गापासून पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा 615 मीटरचा पूल मुंबई महानगरपालिकेने पूर्ण केला, त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन', फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीसांनी केले मुंबई महानगरपालिकेचे अभिनंदन

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्सवर पोस्ट करत मुंबई महानगरपालिकेचे अभिनंदन केले आहे. फडणवीस म्हणाले की, 'विक्रोळी येथील लालबहादूर शास्त्री मार्गापासून पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा 615 मीटरचा पूल मुंबई महानगरपालिकेने पूर्ण केला, त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!'. 

हेही वाचा:फडणवीसांच्या उपस्थितीतीत नागपूरात उभारणार हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना

काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

'विक्रोळी येथील लालबहादूर शास्त्री मार्गापासून पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा 615 मीटरचा पूल मुंबई महानगरपालिकेने पूर्ण केला, त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! पावसाळ्याच्या कालावधीमध्ये लालबहादूर शास्त्री मार्गावर बऱ्याच वेळा वाहतूक कोंडी होते, नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. ही बाब विचारात घेता कोणत्याही अधिकृत समारंभाची वाट न पाहता हा पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय मी, तसेच माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतला आहे आणि तसे आदेश सुद्धा दिले आहेत', अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.

हेही वाचा: अहमदाबाद विमान दुर्घटनेत 22 वर्षीय इरफान शेखचा मृत्यू

पुढे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 'मी मुख्यमंत्री असताना 2018 मध्ये या कामाचे आदेश दिले होते. 104.77 कोटी रुपये त्यावर खर्च करण्यात आला. येणाऱ्या काळात पाऊस लक्षात घेता मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये, म्हणून हा पूल शनिवार, दि. 14 जून 2025 रोजी दुपारी 4 वाजेपासून वाहतुकीसाठी खुला करावा, असे निर्देश आम्ही बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि पोलिसांना दिले आहेत'.


सम्बन्धित सामग्री