Thursday, August 21, 2025 02:10:06 AM

पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर हसन मुश्रीफ देणार 'या' पदाचा राजीनामा

वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता हसन मुश्रीफ यांनी आणखी एका पदावरून राजीनामा देण्याच्या मार्गावर आहेत.

पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर हसन मुश्रीफ देणार या पदाचा राजीनामा

सांगली: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे, माणिकराव कोकाटेंनी कृषीमंत्री पदाचा द्यावा, अशी मागणी सर्वत्र होत आहे तर दुसरीकडे अजितदादांचा शिलेदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा देत खळबळ उडवली. अशातच, पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता हसन मुश्रीफ यांनी आणखी एका पदावरून राजीनामा देण्याच्या मार्गावर आहेत. 

हेही वाचा: अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत; अंबाबाईच्या चरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे साकडे

सोमवारी रात्री, हसन मुश्रीफ सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या नवीन इमारतीच्या उदघाटन समारंभासाठी सांगलीत आले होते. या दरम्यान, हसन मुश्रीफ म्हणाले की, 'लवकरच आपण कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहोत'. पुढे, हसन मुश्रीफ म्हणाले की, 'मागील दहा वर्षांपासून मी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अध्यक्ष आहे. यासह, राज्याच्या मंत्रीमंडळातही मी अनेक वर्षे कार्यरत आहे. नुकताच, माझा मुलगा नविद मुश्रीफ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा अध्यक्ष झाला आहे. त्यामुळे सगळीच पदे घरात नको म्हणून मी जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहे'. 

हेही वाचा: कोकाटेंनी तातडीने राजीनामा द्यावा; सुप्रिया सुळेंची ट्वीट करत मागणी

हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्यानंतर बँकेचा अध्यक्ष कोण होणार? याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. सूत्रांनुसार, ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील, राजेश पाटील, भैय्या माने, बाबासाहेब पाटील-असुर्लेकर यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते किंवा कॉग्रेस आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. 


सम्बन्धित सामग्री