मुंबई: शिवसेनेला महत्त्वाची खाती मिळणार आहेत, पण गृह आणि अर्थ खात्यांचा त्यात समावेश नाही. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेच्या वाट्याला येणारी खाती पुढीलप्रमाणे असू शकतात:
गृहनिर्माण
नगर विकास
उद्योग
पर्यटन
शालेय शिक्षण
पाणी पुरवठा
जलसंधारण
मराठी भाषा
माजी सैनिक कल्याण
खनिकर्म
आरोग्य
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
हे विभाग शिवसेनेच्या नेतृत्वाने मिळवण्याची शक्यता आहे, असे जय महाराष्ट्राच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. शिवसेनेचा शक्तीप्रदर्शन आणि सत्तेसाठीची रणनीती महत्त्वपूर्ण ठरू शकते.महत्वाची खाती न मिळाल्यामुळे असंतोष निर्माण होण्याची शक्यता असून, येणाऱ्या काळात या खातींच्या वाटपावर लक्ष राहील.