नागपूर : हिवाळी अधिवेशनात कल्याणमध्ये मराठी माणसावर अन्याय झालेल्या घटनेचे पडसाद दिसून येत आहेत. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. मुंबई परिसर, महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच आहे. त्यामुळे मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही. अखिलेश शुक्ला यांना तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अखिलेश शुक्ला हा MTDC चा कर्मचारी आहे. घर नाकारण्याचे अधिकार कोणालाही नाही. शाकाहाराच्या आधारावर भेदभाव करता येणार नाही असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा : कल्याणमध्ये हायप्रोफाईल राडा
कल्याणमध्ये घडले काय?
कल्याणमध्ये धूप लावण्याच्या कारणावरून काही जणांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत लोखंडी रोडने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत अभिजीत देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर विजय कळविकटे, धीरज देशमुख हे जखमी झाले आहेत. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे . तर याप्रकरणी समीर कळविकटे यांनी अखिलेश शुक्ला यांच्या घराबाहेर धूप लावले होते. या धुराने त्रास होत असल्याने आम्ही त्यांना धूप लावू नका असे सांगितले. मात्र शुक्ला आणि त्यांच्या पत्नीने आमच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी आमच्या शेजारी राहणाऱ्या अभिजीत देशमुख यांनी मध्यस्थी केली. मात्र त्यानंतर काही वेळात शुक्ला यांनी 15 ते 20 जण बोलावून आम्हाला लोखंडी रोडने मारहाण केल्याचा आरोप केला.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.