Thursday, August 21, 2025 02:12:56 AM

विरोधकांकडून आमदारकीची शपथ

विरोधकांनी आमदारकीची शपथ घेतली आहे.

विरोधकांकडून आमदारकीची शपथ

मुंबई : विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. विरोधकांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. संविधानाची प्रत हातात घेऊन काँग्रेसच्या नाना पटोले यांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. पटोलेंसह विजय वडेट्टीवार यांनीदेखील आमदारकीची शपथ घेतली आहे. ठाकरे सेनेच्या आदित्य ठाकरे यांनीही आमदारकीची शपथ घेतली आहे.

 

विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक आक्रमक होते. त्यांनी आमदारकीची शपथ घेण्यास नकार देत बहिष्कार टाकला होता. महायुती सरकारचा विजय हा विजय नसून निवडणूक आयोगाला हाताशी धरून मिळवलेला विजय आहे असा आरोप विरोधकांनी केला होता. तसेच लोकशाहीला चिरडून टाकण्याचे काम सरकारने केले असल्याचा आरोप ठाकरे सेनेच्या आदित्य ठाकरे यांनी केला आहे. जनतेच्या मनात या सरकारबाबत आनंद नाही. जनतेच्या भावनांचा विचार करत शपथविधीवर बहिष्कार घालत असल्याचे विरोधकांनी सांगितले.  

विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी शनिवारी शपथ घेतली. त्यानंतर नाना पटोले यांचे नाव पुकारण्यात आले. तेव्हा शपथ न घेता मविआचे सर्व सदस्य सभागृहाच्या बाहेर पडले. महायुतीच्या विजयावर ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथ न घेण्याचा निर्णय घेतला होता.     


सम्बन्धित सामग्री