भंडारा: नुकताच, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोलेंनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे, ज्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. 'भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग आहे', असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे. त्यांनी थेट सत्ताधारी पक्षावर वार केला आहे.
हेही वाचा: राहुल गांधींच्या लेखाला मुख्यमंत्री फडणवीसांचं लेखाने उत्तर
काय म्हणाले नाना पाटोले?
'हा विषय घेऊन आम्ही माननीय सुप्रीम कोर्टात गेलो आहोत. सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला अपेक्षा आहे की या सगळ्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये मॅच फिक्सिंग आणि निवडणूक आयोग आणि भाजप यांनी केलं आहे. कारण, भाजपचे अंधभक्त ज्या पद्धतीने राहुल गांधींच्या वक्तव्यावर तुटून पडतात, याचा अर्थ भाजप आणि निवडणूक आयोगाचं मॅच फिक्सिंग आहे', असं वक्तव्य नाना पटोलेंनी सत्ताधारी पक्षावर केला आहे.