Thursday, August 21, 2025 02:12:28 AM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिल पाटील आणि लहू कानडे यांची नियुक्ती

अनिल पाटील यांच्याकडे धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांची जबाबदारीलहू कानडे यांच्यावर सामाजिक न्याय विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिल पाटील आणि लहू कानडे यांची नियुक्ती

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत वरिष्ठ उपाध्यक्षपदी माजी मंत्री अनिल भाईदास पाटील आणि माजी आमदार लहू कानडे यांची नियुक्ती जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी ही घोषणा करत या दोन्ही नेत्यांवर पक्ष संघटनेची मोठी जबाबदारी सोपवली आहे.

या नियुक्तीनुसार अनिल भाईदास पाटील यांना जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांच्या प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर माजी आमदार लहू कानडे यांना सामाजिक न्याय विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आणि पक्षाची ध्येयधोरणे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही दोन्ही नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दोन्ही नेत्यांचे अभिनंदन करत पक्षवाढीसाठी त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण करणाऱ्या या नियुक्तींमुळे पक्षसंघटना अधिक मजबूत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या निर्णयामुळे स्थानिक पातळीवरील पक्ष संघटनेस चालना मिळेल आणि आगामी काळात पक्षाचे जनसंपर्क अधिक व्यापक होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

👉👉 हे देखील वाचा : मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक, महिलेसह मुलगा जखमी
 


सम्बन्धित सामग्री