मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यात मराठी आणि हिंदी मुद्यावरून चांगलाच वाद पेटला आहे. नुकताच, बाजप नेते निशिकांत दुबेंनी शनिवारी राज ठाकरेंना आव्हान दिलं होतं. यावर, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी शुक्रवारी आपल्या भाषणातून दुबेंना प्रत्युत्तर दिले की, 'दुबे, तुम मुंबई में आ जाओ. मुंबई के समुंदर में डुबे डुबे कर मारेंगे'. मात्र, इतकं सगळं होऊनही निशिकांत दुबे काही शांत होईना. त्यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना डिवचले. दुबे म्हणाले की, 'मैंने राज ठाकरे को हिंदी सिखा दी'. यामुळे, मनसे आणि भाजप यांच्यातील मराठी-हिंदीचा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एका मुलाखतीत, बाजप नेते निशिकांत दुबेंनी राज ठाकरेंवर टीका केली होती. ते म्हणाले की, 'मुंबईत हिंदी भाषिकांना मारहाण करणाऱ्यांमध्ये हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा, तमिळ आणि तेलगू भाषिकांना मारून दाखवा. जर तुम्ही इतके मोठे बॉस असाल तर बिहार, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये या. हम तुमको पटक-पटक के मारेंगे', असं वक्तव्य दुबेंनी केलं.
दुबेंना प्रत्युत्तर देत राज ठाकरे काय म्हणाले?
शुक्रवारी मीरा-भाईंदरमध्ये राज ठाकरेंची 'राज' सभा झाली होती. यादरम्यान, राज ठाकरेंनी दुबे यांना मुंबईत येण्याचे आव्हान देत म्हणाले की, 'भाजपच्या एका खासदाराने म्हटले की आम्ही इथे मराठी लोकांना मारहाण करू… तुम्ही मुंबईत या. हम आपको मुंबई के समुंदर में डूबो-डुबो के मारेंगे'. मात्र, इतकं होऊनही दुबेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना डिवचले. दुबे म्हणाले की, 'मैंने राज ठाकरे को हिंदी सिखा दी'.