उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विजयी मेळाव्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आले आहेत आणि त्याला उद्धव ठाकरेंचा वाढदिवस निमित्त ठरला आहे. मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. मातोश्रीवर जात राज यांनी उद्धवना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी मातोश्रीवर ठाकरे बंधूंची गळाभेट झाली आहे.
विजयी मेळाव्याआधी ठाकरे बंधू कधी भेटले?
17 जुलै 2012 रोजी छातीत दुखत असल्यानं उद्धव ठाकरे लीलावतीत दाखल झाले होते. यावेळी राज ठाकरे रूग्णालयात भेटीला गेले होते. 2012 मध्ये जुलैलाच उद्धव यांना लीलावतीतून डिस्चार्ज मिळाला तेव्हा राज यांच्याकडून उद्धव यांच्या गाडीचं सारथ्य करण्यात आलं होतं. 10 जानेवारी 2015 रोजी जहांगीर आर्ट गॅलरीत उद्धव यांच्या चित्रांचं प्रदर्शन झालं होतं. या प्रदर्शनावेळी राज ठाकरेंनी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती.