Wednesday, August 20, 2025 05:36:47 PM

'जंगली रमी पे आओ ना महाराज'; कृषीमंत्र्यावर रोहित पवार आक्रमक

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला, ज्यात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे चक्क 'जंगली रमी' खेळत होते.

जंगली रमी पे आओ ना महाराज कृषीमंत्र्यावर रोहित पवार आक्रमक

मुंबई: काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक व्यक्तव्य केले होते. तटकरे म्हणाले की, 'दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र यायची वेळ आल्यास आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा सल्ला घेऊ'. तटकरेंना प्रत्युत्तर देत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला, ज्यात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे चक्क 'जंगली रमी' खेळत होते. तसेच, हा व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचा वर्षाव केला. 

हेही वाचा: ठाकरे ब्रँड बाजारात चालत नाही; मुनगंटीवारांचा ठाकरे बंधूंना टोला

रविवारी सकाळी, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे भर विधानसभेच्या सभागृहात 'जंगली रमी' खेळत होते. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी एक कॅप्शन देखील दिले आहे. 'जंगली रमी पे आओ ना महाराज.. खरंतर सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपाला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात दररोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना देखील, सभागृहात काहीच काम नसल्यामुळे कृषीमंत्री कोकाटे यांच्यावर रमी खेळण्याची वेळी येत असावी', असा टोला रोहित पवारांनी लगावला.

पुढे रोहित पवारांनी सवाल उपस्थित करत म्हणाले की, 'कभी गरीब किसानो की खेती पर भी आओ ना महाराज. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा, कर्जमाफी, भावांतराची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्त आवाज ऐकू येईल का?'. यासह, 'कधीतरी शेतीवर या महाराज! खेळ थांबवा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या', असं देखील रोहित पवार म्हणाले. 


सम्बन्धित सामग्री