Wednesday, August 20, 2025 01:05:04 PM

'ईव्हीएमविरोधातील आंदोलन राजीनामे देऊन सुरू करा'

ईव्हीएमच्या समर्थनार्थ मारकडवाडीत गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची सभा जाहीर सभा झाली.

ईव्हीएमविरोधातील आंदोलन राजीनामे देऊन सुरू करा

सोलापूर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. या निकालात महायुतीने बाजी मारली आणि राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. परंतु त्यानंतर विरोधकांनी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करत निवडणुक प्रक्रियेवर ताशेरे ओढले. विधानसभा निवडणुकीनंतर मारकडवाडी गाव चर्चेत आले आहे. माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी गावातील ग्रामस्थांनी थेट ईव्हीएम मशीनच्या यंत्रणेवर अविश्वास दाखवत आंदोलनाला सुरूवात केली आहे. त्यामुळे मारकडवाडी गावाची राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मारकडवाडीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या सभा होत आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी थेट मारकडवाडीत जात एकमेकांवर टीकास्त्र झाडण्यास सुरूवात केली आहे.

ईव्हीएमच्या समर्थनार्थ मारकडवाडीत गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची सभा जाहीर सभा झाली. याआधी शरद पवार यांनी ईव्हीएमविरोधात सभा घेतली होती. या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाच्या हा प्रयत्न असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी मारकडवाडीतील सभेत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील जयंत पाटील, रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावरही जोरदार टीकास्त्र डागले आहे.

'ईव्हीएमविरोधातील आंदोलन राजीनामे देऊन सुरू करा'

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची ईव्हीएमविरोधात मारकडवाडीत सभा झाली होती. शरद पवार यांनी ईव्हीएमला विरोध करत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली होती. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर टीका करण्यास सुरूवात केली. बॅलेट पेपरवर मतदान करण्याची मागणी करणाऱ्या आणि आंदोलन करणाऱ्या शरद पवारांना आमचे आवाहन आहे की त्यांनी आपल्या लेकीचा, नातवाचा आणि जयंत पाटलांचा राजीनामा द्यावा. त्यानंतर खुशाल आंदोलन पुढे नेले पाहिजे. तसेच राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना राजीनामा देऊन आंदोलनात सहभागी झालं पाहिजे असे पडळकर यांनी  म्हटले आहे. अन्यथा ईव्हीएमवर थोबाड उचकटायचं नाही अशी जोरदार टोलेबाजी त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर केली आहे. यादरम्यान शरद पवारांचा डाव उधळण्यासाठी आम्ही आलोय असे गोपीचंद पडळरांनी म्हटले आहे.


सम्बन्धित सामग्री