Monday, September 01, 2025 01:19:44 PM

'या' कारणामुळे विठ्ठल पाटील यांनी मानले फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचे आभार

खरे तर वारकरी साहित्य परिषदेच्या अनुदानासाठी 3 कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, मानाच्या पालख्या 1080 इतक्या झाल्या. यावर्षी, उर्वरित राज्यातील दिंड्यांनाही शहानिशा करून मानधन देण्याचे ठरले आहे.

या कारणामुळे विठ्ठल पाटील यांनी मानले फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचे आभार

चंद्रकांत शिंदे, मुंबई: गतवर्षी वारकरी साहित्य परिषदेच्या मागणीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महादजी शिंदे यांच्यानंतर आषाढी वारीच्या दिंडी सोहळ्यास सर्व दिंड्यांना 20 हजार रुपये प्रमाणे सामाजिक न्याय विभागाच्या जादूटोणा आणि व्यसनमुक्ती विरोधी प्रचार निधीतून रक्कम मंजूर केली. ही रक्कम दोन कोटी 16 लाख रुपये इतकी वाटप करण्यात आली.

खरे तर वारकरी साहित्य परिषदेच्या अनुदानासाठी 3 कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, मानाच्या पालख्या 1080 इतक्या झाल्या. यावर्षी, उर्वरित राज्यातील दिंड्यांनाही शहानिशा करून मानधन देण्याचे ठरले आहे. अशी मान्यता सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मान्यतेने वारकरी साहित्य परिषदेच्या मागणीप्रमाणे अनुदान देण्यास मंजूर केली आहे.

वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील म्हणाले:

'कितीही दिंड्या वाढल्या तरी अनुदान देण्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मान्य केले आहे. आतापर्यंत राज्यातील 1000 दिंड्यांना अनुदान वाटप झाले असून, मानाच्या पालखीमध्ये ज्यांनी नाव नोंदणीसाठी अर्ज केला आहे, त्यांनी मानाच्या पालखीतून नाव नोंदणीचा पुरावा सादर केल्यावर तातडीने अनुदान मिळेल. तसेच इतर दिंड्यांनी माननीय आयुक्त पुणे महसूल विभाग यांच्याकडे सक्षम पुरावा सादर केल्यास त्यांनाही तातडीने अनुदान मिळेल. जर कुणाला अनुदान मिळण्यास अडचण आल्यास त्यांनी वारकरी साहित्य परिषदेशी संपर्क साधावा', असे आवाहन विठ्ठल पाटील यांनी केले आहे.


सम्बन्धित सामग्री