नागपूर : राज्यात हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली असून आज चौथा दिवस आहे. या दिवशी नाना पटोले यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर तसेच परभणी हिंसाचाराच्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले आहे.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून पटोले यांनी चर्चा केली आहे. ज्या मंत्र्यांवर संशय ते सभागृहात आलेच नाहीत. बीडप्रकरणी संशय असलेले मंत्री कुठे आहेत? असा सवालही त्यांनी केला आहे. सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात विष्णू चाटेसह चौघांना अटक करण्यात आली आहे. चाटे हा धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्या जवळचा माणूस असल्याचे समजते.
हेही वाचा: संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल समोर; काय आहे अहवालात?
परभणी हिंसाचाराच्या मुद्द्यावरही त्यांनी चर्चा केली आहे. परभणीत बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ असणाऱ्या संविधानाची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे आंबेडकर अनुयायांचा संताप झाला आणि त्यांनी जाळपोळ करायला सुरूवात केली. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला होता. त्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना ताब्यात घेतले. त्याच प्रकरणावर बोलताना पोलिसांचा लाठीचार्ज आक्षेपार्ह असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. लाठीमार कुणी करायला लावला? आणि पोलिसांवर कुणाचं नियंत्रण होतं असा सवालही त्यांनी केला आहे. पोलिसांनी बेदम मारहाण केल्यानं सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोम्बिंग ऑपरेशन आक्षेपार्ह आहे. अशा घटना वेशीच रोखायला हव्यात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
एकाही पोलिसांवर अजूनही कारवाई का नाही असा सवाल त्यांनी केला आहे. राज्यात दलितांवर होणारे अत्याचार वेदनादायी असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.