Wednesday, August 20, 2025 09:35:49 AM

शपथविधी सोहळ्याला कोणा कोणाची हजेरी ?

मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

शपथविधी सोहळ्याला कोणा कोणाची हजेरी

मुंबई : मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सितारामण, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा (जे.पी.नड्डा), रेल्वेमंत्री अश्विनी  वैष्णव,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते. 

शपथविधी सोहळ्याला उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, हरियाणा अशा महत्त्वाच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती होती.  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्रप्रदेश मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीन कुमार, अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिश्व शर्मा, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र यादव, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराडा संगमा, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री मानिक साहा, उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी आदी राज्याचे मुख्यमंत्री शपथविधीसाठी उपस्थित होते.
शपथविधी सोहळ्याला चित्रपट विश्ववातील दिग्गजांनादेखील आमंत्रित करण्यात आले होते. बॉलीवूड स्टार सलमान खान, शाहरूख खान, सचिन तेंडूलकर, अंजली तेंडुलकर, विक्रांत मेसी, जय कोटक, एकता कपूर, मुकेश अंबानी, अनंत अंबानी, जानवी कपूर, विद्या बालन, सिद्धार्थ कपूर, वरुण धवन, अनिल अंबानी, माधुरी दीक्षित, श्रीराम नेने, रणबीर कपूर, रणवीर सिंह, गीतांजली किर्लोस्कर, बिरेन्द्र सराफ, राजेश अदानी, मनोज सैनिक, के के तातेड़, मृदुला भाटकर, निखिल मेसवानी, हेतल मेसवानी, नीरजा चौधरी, योगेश पुढारी, रोहित शेट्टी, अर्जुन कपूर, सतीश मेहता, एटली, बोनी कपूर, श्रद्धा कपूर, बादशाह, जयेश शाह, जॉन इब्राहिम, विकी कौशल, खुशी कपूर, रुपाली गांगुली, सुधाकर शेट्टी, धवल मेहता, आलोक संघवी, ज्योति पारेख, आलोक कुमार, अरविंद कुमार हे कला विश्वातील स्टार या सोहळ्यासाठी उपस्थित होते.

शपथविधी सोहळ्यासाठी 400 संत व महंत यांना देखील निमंत्रित करण्यात आले होते. त्यातील नानीदचे नरेंद्र महाराज, भगवानगडचे नामदेव शास्त्री, इस्कॉनचे राधानाथ स्वामी महाराज आणि गौरांगदास महाराज, जनार्दन हरीजी महाराज, प्रसाद महाराज अंमळनेरकर, महानुभाव संप्रदायाचे विध्वंसबाबा व मोहन महाराज, जैन मुनी लोकेश आदी संत व महंतांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.  


सम्बन्धित सामग्री