Thursday, September 04, 2025 10:50:13 PM

धनंजय मुंडे मंत्रिमंडळात परतणार?

धनंजय मुंडे मंत्रिमंडळात परतणार

 

माजी मंत्री धनंजय मुंडे मंत्रिमंडळात परतणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दोन दिवसांपासून मंत्रिमंडळातील आठ मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. अशातच आता मुंडे मंत्रिमंडळात येणार असल्याच्या चर्चांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांना कदाचित धनंजय मुंडे यांना परत मंत्रिमंडळात आणायचे आहे. हे करण्यासाठी मुंडेच्या सरकारी वकिलांनी कोर्टात जी मांडणी केली, ती चुकीच्या आहे आणि म्हणूनच हे घडलं असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. आता चुकीची मांडणी थांबवून मुंडे विरोधातील पुरावे गोळा करायला हवे. मुंडेंची बाजू कशी चुकीची आहे, हे दाखवून द्यायला हवे असे दमानिया यांनी सांगितले. 
 


सम्बन्धित सामग्री