मुंबई: आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातल्या निकृष्ट जेवणामुळे एका कर्मचाऱ्याला मारहाण केली. कॅन्टीनमध्ये त्याने राडा घातला आहे. यामुळे सध्या त्यांच्यावर विरोधी पक्षाकडून जोरदार टीका केली जात आहे. वरण खराब असण्याला सरकार जबाबदार आहे. यापेक्षाही वाईट वरण आदिवासी पाड्यांवर असते. मोदी सरकार जे फुकट धान्य वाटप करतं, त्याची गुणवत्ता बघा. अशाप्रकारे टॉवेलवर एका आमदारानं मारहाण करायची का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
'वरण खराब असण्याला तुमचं सरकार जबाबदार'
आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होताना दिसत आहे. यामुळे गायकवाडांवर टीका होत आहेत. जर वरण खराब असेल त्याला जबाबदार कोण? तुमचं सरकार आहे. यापेक्षा वाईट वरण महाराष्ट्रामध्ये आदिवासी पाड्यांवर गोरगरिबांच्या घरात मिळते असे गायकवाड यांनी म्हटले आहे. मोदीजी फुकट धान्य वाटत आहेत. सगळ्यांनी त्या धान्याची क्वालिटी बघा असेही राऊतांनी म्हटले आहे.
हेही वाचा: संजय गायकवाडांनी केलेल्या मारहाणीचा विरोधकांकडून समाचार
'टॉवेलवर मारहाण करायची का एका आमदाराने?'
आमदारांना 50 कोटी मिळाले आहेत. जेवण करणाऱ्यांना 50, 50 कोटी मिळाले नाहीत. भ्रष्टाचार त्या कॅन्टींनमध्ये सुरू आहे. अशाप्रकारे टॉवेलवर मारहाण करायची का एका आमदाराने? असा सवाल राऊतांनी गायकवाडांना केला आहे. मी आज मुख्यमंत्र्यांना माझ्या ट्विटरच्या माध्यमातून कळवलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था कोणालाही मारहाण करायची आणि मग आपली बाजू मांडायची वरण मिळाली नाही, भात मिळाला नाही मला असं वाटत नाही. तक्रार करण्याचे काही मार्ग आहेत. तुम्ही त्याला मारहाण करण्याआधी विधानसभेत हा प्रश्न मांडू शकता. तुम्ही मुख्यमंत्र्यांना किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना पत्र लिहून तक्रार करू शकता पण तुम्ही त्या गरीब माणसाला, कर्मचाऱ्याला मारहाण केली त्याचा काय दोष असाही प्रश्व त्यांनी संजय गायकवाडांना केला आहे.
'तुमचे आमदार गरिबाला लाथा बुक्क्याने मारत आहेत'
राऊत म्हणाले, हे सरकार आणि या सरकारचे आमदार राज्यातील जे दुर्बल आहेत, जे गरीब आहेत, जे तुमच्या अरे ला का रे करू शकत नाहीत. त्यांनाच तुम्ही मारता. आता हे त्यांच्या अंगलट आलं आहे. त्यामुळे ते कर्मचारी, अमुक तमुक त्यांच्यावर दोष टाकतील पण जर मुख्यमंत्र्यांनी हा व्हिडिओ पाहिला असेल तर ज्या क्रूरपणे त्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली. तो गरीब आहे आणि तुम्ही त्या गरिबाला लाथा बुक्क्याने मारत आहात. तुमचे आमदार मारत आहेत. याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी राऊतांनी केली आहे.