मुंबई: ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्यावर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काही गंभीर आरोप केले होते. परब म्हणाले की, 'योगेश कदम यांचे कार्यकर्ते वाळू चोरीमध्ये सहभागी आहेत'. पुढे, अनिल परब यांनी खळबळजनक दवा केला की, 'योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत सावली रेस्टॉरंट अँड बार आहे. या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला. मुली ताब्यात घेतल्या. हा डान्सबार आहे'. परबांनी केलेल्या आरोपांनंतर, मंगळवारी योगेश कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन परब यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं यांनी पत्रकार परिषद घेऊन परब यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
हेही वाचा: नागपूर विमानतळ प्रशासनाला धमकीचा मेल; शोध मोहीम सुरू
काय म्हणाले योगेश कदम?
अनिल परब यांनी केलेल्या आरोपांवर गृहराज्य मंत्री योगेश कदम म्हणाले की, 'अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अनिल परब यांनी नियम मोडून माझ्यावर आरोप केले. परबांनी आपल्या अकलेचे तारे तोडले, त्यांनी वाळू चोरीचा आरोप केला. अनिल परबांविरोधात मी हक्कभंग आणणार आहे, अनिल परबांविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. माझ्या आईचा काहीही संबंध नसताना आरोप करण्यात आले, कोणत्याही प्रकरणाशी माझा संबंध असला तरी मी राजीनामा देईल, चुकीचे आरोप करून माझ्या आईला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे, अनिल परबांना माफी मागावीच लागेल'.
पुढे कदम म्हणाले की, 'मी वाळू विकली, वाळू विक्रेत्यांना माझा आश्रय आहे, असे आरोप परब यांनी केले. मंडनगडच्या महादेव नाल येथे पाणी साचत होते. तेथील गाळ काढला पाहिजे अशी मागणी मी केली होती. नियमानुसार त्याला परवानगी होती. ही परवानगी मिळाल्यानंतर न्यायालयाच्या नियमानुसार मी रॉयल्टी भरली होती. मे महिन्यात गाळाचा उपसा झाला, खेडमध्ये जगबुडी नदीचं पाणी शिरतं, तेथील गाळ काढला जावा अशी नागरिकांची मागणी होती, जगबुडी नदीत गाळ आहे. वाळू नाही. घरकुलाचा आणि जगबुडी नदीच्या वाळूचा काडीमात्र संबध नाही. यासह, गाळ काढून नेण्याची जबाबदारी 24 शेतकऱ्यांना नियमाने दिली होती. हा गाळ विकला जात नाही, कोणी तो घेत नाही'.