Sunday, August 31, 2025 09:10:24 AM

महाशिवरात्रीच्या दिवशी 'या' मंत्रांचा जाप केल्यास महादेव होतील प्रसन्न

हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे खूप महत्त्व आहे. काहीजण महादेवांची पंचाभिशेक, रुद्राभिषेक पूजा करणार आहेत तर काहीजण मंत्रजाप करणार आहेत. हा उपाय केल्यास महादेवांची कृपा तुमच्यावर होईल.

महाशिवरात्रीच्या दिवशी या मंत्रांचा जाप केल्यास महादेव होतील प्रसन्न

हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे खूप महत्त्व आहे. बुधवारी महाशिवरात्री असल्यामुळे सध्या उत्सुकतेचे वातावरण दिसत आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक शिवमंदिरात आपल्याला भाविकांची प्रचंड गर्दीदेखील पाहायला मिळणार आहे. यादिवशीअनेक ठिकाणी धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनदेखील केले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला अनेक प्रकारचे नियम देखील पाळावे लागणार आहेत. महाशिवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावर अनेक शिवभक्त आपल्या आराध्य दैवतांना म्हणजेच महादेवांना प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करणार आहेत. काहीजण महादेवांची पंचाभिशेक, जलाभिषेक, रुद्राभिषेक पूजा करणार आहेत तर महादेवांना प्रसन्न करण्यासाठी काहीजण महादेवांचे नामस्मरण, मंत्रजाप करणार आहेत तर काहीजण उपवास करणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणते उपाय केल्यास महादेवांची कृपा तुमच्यावर होईल. 

MAHASHIVRATRI 2025: महाशिवरात्रीला 'या' तीन राशींना होणार धनलाभ

१ - महामृत्यूंजय मंत्र:

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्‌। 
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्।।


या मंत्राचा जाप केल्याने व्यक्तीला मृत्यूचे भय अजिबात होत नाही. त्यासोबतच व्यक्तीला मृत्यूवर विजय देखील प्राप्त करता येते. इतकेच नाही तर या मंत्राचा जप केल्याने चिंता, रोग आणि अकाल मृत्यू या सर्व गोष्टींपासून देखील मुक्ती मिळते. रुद्राक्षची माळ ध्यानसाधनेसाठी वापरल्यास त्या व्यक्तीला दुप्पट लाभ मिळतो आणि व्यक्ती दीर्घायुषी आणि शक्तिशाली होते. मात्र, या मंत्राचा जप करताना काही गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक आहे. या मंत्राचा जप करण्याआधी महादेवांसमोर तुपाचा दिवा लावावा आणि जप पूर्ण होईपर्यंत दिवा सुरु ठेवावा. त्यासोबत जप करताना मंत्राचे उच्चारण स्पष्ट असायला हवे. 

२ - शिवस्तुति: शिवस्तुती महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांची स्तुती कारण्यासाठी प्रामुख्याने केले जाते. त्यासोबतच शिवस्तुतीचे पठण केल्यास सर्व भौतिक सुखांची प्राप्ती होते आणि सर्वप्रकारचे रोगही दूर होतात. इतकेच नाही तर शिवस्तुती वाचल्यास मनोकामना देखील पूर्ण होतात आणि व्यक्तीची सर्व पाप दोषातून मुक्तता होते.

हेही वाचा: MAHASHIVRATRI 2025: महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंग कोणते आहेत?

३ - शिव तांडव: लंकेचा राजा असलेला रावण यांनी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी या स्तोत्राची उत्पत्ती केली होती. त्यामुळे महाशिवरात्रीदिवशी हा स्तोत्र वाचल्यास महादेव आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होतात. त्यासोबतच भक्तांच्या जीवनामध्ये यशप्राप्ती होते. शिव तांडव स्तोत्र हे अतिशय शक्तिशाली आणि ऊर्जा देणारा  स्तोत्र आहे. शिव तांडव स्तोत्र हे महादेवांच्या शक्ती आणि त्यांच्या तांडव नृत्याची स्तुति आहे. 

(Disclaimer - येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री