Tuesday, September 02, 2025 12:24:11 AM

होळीच्या रंगांवर खग्रास चंद्रग्रहणाची सावली!

या वर्षीची होळी आणखी खास ठरणार आहे कारण २५ वर्षांनंतर पहिल्यांदाच होळीच्या दिवशी चंद्रग्रहण होणार आहे

होळीच्या रंगांवर खग्रास चंद्रग्रहणाची सावली

मुंबई: यंदाच्या होळीला खास बनवणारे काही दुर्लभ संयोग होत आहेत. 7 मार्चपासून होलाष्टक सुरू होणार असून, 13 मार्चला होलिका दहन होईल. विशेष म्हणजे, यावर्षी होळीच्या सणावर खग्रास चंद्रग्रहण आणि खरमास यांचा प्रभाव राहणार आहे.

चंद्रग्रहण आणि होळीचा संयोग
या वर्षीची होळी आणखी खास ठरणार आहे कारण २५ वर्षांनंतर पहिल्यांदाच होळीच्या दिवशी चंद्रग्रहण होणार आहे. 13 मार्चच्या रात्री चंद्रग्रहण सुरू होईल आणि 14 मार्चच्या पहाटेपर्यंत ते प्रभावी राहील. त्यामुळे धार्मिकदृष्ट्या होळीच्या पूजनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.पंचांगानुसार, 14 मार्चपासून खरमास सुरू होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार खरमास शुभ कार्यांसाठी अशुभ मानला जातो. या महिन्यात विवाह, गृहप्रवेश आणि नवीन व्यवसाय सुरू करणे टाळावे, असा संकेत दिला जातो.


13 मार्चला होणाऱ्या होलिका दहनवर13 तास 12 मिनिटे भद्राकाळाचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे होलिका दहनसाठी योग्य वेळ निवडण्यावर भर दिला जात आहे.यंदाच्या होळीला धार्मिक आणि खगोलीय महत्त्व असल्याने श्रद्धा आणि शास्त्र यांचा समतोल राखून सण साजरा करण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रज्ञांनी दिला आहे. होळीचा उत्सव आणि रंगपंचमी आनंदाने साजरी करताना ग्रह-तारकांचे प्रभाव लक्षात घेणे गरजेचे आहे.


सम्बन्धित सामग्री