Wednesday, August 20, 2025 08:31:52 PM

घटस्फोटानंतर क्रिकेटपटू युजवेंद्र देणार धनश्रीला 'इतकी' पोटगी. वाचून व्हाल थक्क

भारतीय संघाचा क्रिकेटपटू युजवेंद्र आणि धनश्री यांनी शुक्रवारी बांद्र्यातील फॅमिली कोर्टामध्ये घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण केले असून अखेर शुक्रवारी त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांना शिक्कामोर्तब लागला आहे.

घटस्फोटानंतर क्रिकेटपटू युजवेंद्र देणार धनश्रीला इतकी पोटगी वाचून व्हाल थक्क

भारतीय संघाचा क्रिकेटपटू युजवेंद्र आणि धनश्री यांनी शुक्रवारी बांद्र्यातील फॅमिली कोर्टामध्ये घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण केले असून अखेर शुक्रवारी त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांना शिक्कामोर्तब लागला आहे. त्यांच्या घटस्फोटाची माहिती मिळताच त्यांच्या चाहत्यांमध्ये दुःखाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या 18 महिन्यांपासून दोघे वेगळे राहत होते. मागील काही महिन्यापासून दोघांबाबत अनेक प्रकारची बातमी ऐकायला मिळत होती. 
             मागील काही महिन्यांपासून दोघांमध्ये विविध कारणांमुळे वाद - विवाद सुरु होते. युजवेंद्र आणि धनश्री यांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले. त्यानंतर युजवेंद्र आणि धनश्री यांच्या अनेक बातम्या चर्चेचा मुख्य विषय होऊ लागला. सूत्रांनुसार धनश्रीने बांद्र्यातील फॅमिली कोर्टामध्ये पोटगीसाठी 60 कोटी रुपयांची मागणी केली असून याची माहिती अद्याप स्पष्ट झाले नाही. 
              भारतीय संघाचा क्रिकेटपटू युजवेंद्र आणि धनश्री यांचा विवाह 22 डिसेंबर 2020 रोजी झाला होता. लग्नाच्या 4 वर्षानंतर अनेक कारणांमुळे दोघे वेगवेगळे राहू लागले. एक्सवर युजवेंद्र आणि धनश्री यांचा घटस्फोट सध्या चर्चेचा विषय झाला असून अनेक नेटकऱ्यांनी यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक युजर म्हणतो, "भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांनी 18 महिन्यांपासून वेगळे राहिल्यानंतर एकमेकांच्या  संमतीने घटस्फोट घेतला आहे. दोघांनी मुंबईच्या वांद्रे फॅमिली कोर्टात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली, जिथे त्यांनी उघड केले की ते गेल्या 18 महिन्यांपासून वेगळे राहत होते. घटस्फोटाचे मुख्य कारण 'कम्पॅटिबिलिटी संबंधित' आहे". 
         तर दुसरी युजर म्हणते अखेर 18 महिन्यांनी वेगळे झाल्यानंतर युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी कोर्टात जाऊन घटस्फोट घेतला! युझवेंद्र चहल धनश्री वर्माला पोटगी म्हणून 60 कोटी रुपये देणार असल्याची एक बातमीही व्हायरल झाली आहे, या बातमीत कितपत तथ्य आहे हे माहीत नाही, पण आधुनिक युगात लग्न आणि त्यानंतर घटस्फोट हा चांगला व्यवसाय झाला आहे".


सम्बन्धित सामग्री